मराठीचा आग्रह धरला म्हणून तरुणाला मागावी लागली माफी, मुंब्र्यातली धक्कादायक घटना
मराठी भाषेचा आग्रह धरला म्हणून एका तरुणाला चक्क माफी मागावी लागली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर पोलिसांनी मराठी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
मुंब्रा भागात विशाल गवळी हा फळं विकत घ्यायला होता. तेव्हा फळविक्रेत्यासोबत फळांच्या भावावरून दोघांत वाद झाला. तेव्हा विशालने फळ विक्रेत्याला मराठी येत नाही का असा प्रश्न विचारला. तेव्हा फळ विक्रेत्याने मराठी येत नाही असे सांगितले. महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही, महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलंच पाहिजे असा विशालने आग्रह धरला. त्यानंतर आजूबाजूची लोक जमा झाली आणि त्यांनी विशालला शिवीगाळ केली. जमावाने विशालवर दबाव आणला आणि माफी मागायला लावली. त्यानंतर विशालने कान पकडून फळविक्रेत्याची माफी मागितली. त्यानंतर पोलीस सदर ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी विशालला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List