झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे आयुर्वेदिक, आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे तुमच्या जेवणाची चव तर वाढते त्यासोबतच तुमच्या आरोग्याला फायदे होतात. मसाल्यांमधील अनेक घटक तुमच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. मसाल्यामधील वेलची तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. वेलचीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. अनेकांना चहामध्ये वेलची टाकून पिण्याची सवय असते. वेलचीचा चहा प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते.
रात्री जेवल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी २ ते ३ वेलची खाल्ल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते आणि तुम्हाला ताजेतवाने होण्यास मदत होते. वेलची खाल्ल्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहाण्यासाठी फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार, वेलची खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुम्हाला जर जास्त प्रमाणाच अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ली पाहिजेल.
तुम्हाला रात्री अचानक जाग येत असेल तर झोपण्यापूर्वी २ ते ३ वेलची खाव्यात. यामुळे तुम्हाला शांत झोप लागते आणि तुम्हाला जर तोंडातून दुर्गंधीची समस्या देखील दूर होते. रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यामुळे सकाळी तुमचे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहाता.
रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास तुमच्या शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत होते. त्यासोबतच वेलचीमधील औषधी घटक गॅस, अॅसिडिटी, पोटदुखी आणि मळमळ यांच्यां सारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते. त्यासोबतच रात्री वेलची खाल्ल्यामुळे तुमचं अन्न पचण्यास मदत होते आणि अपचनाचा त्रास होत नाही.
तुम्हाला रात्री गाड झोप लागत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ वेलचीचे सेवन करावे. वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सडेंट्स असतात ज्यामुळे तुम्हाला रात्री गाड झोप लागते. वेलचीचे सेवन केल्यामुळे तुमचा मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते आणि तुमचं मन शांत राहाण्यास मदत होते.
ताज्या वेलचीचे सेवन केल्यामुळे तुमच्या तोंडामधील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते. वेलचीमधील गुणधर्म तुमच्या हिरड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. वेलची खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. वेलची खाल्ल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. वेलचीमधील बॅक्टिरियांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढम्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्तीमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नागीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List