निरोगी राहायचं असेल ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा, तज्ज्ञांकडून यादीच जाणून घ्या
Healthy Diet: आपल्या आरोग्याचा थेट संबंध अन्नाशी आहे. हल्ली आपले खाणे-पिणे असे झाले आहे की, ते आजारांचे कारण बनतात. अनेकदा आपण विचार न करता काही गोष्टी खातो, ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते. हिवाळ्यात आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे, असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे डॉ. अरविंद अग्रवाल सांगतात की, आजकालची अनियमित जीवनशैली आणि खराब आहार हळूहळू आपल्या शरीराला आजारांचे घर बनवत आहे. आपल्या आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असते. आपल्या आहारत काय खावं किंवा काय खाणे टाळावे, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
काय म्हणतात तज्ज्ञ?
व्हाईट ब्रेड, बर्गर आणि पिझ्झा सारख्या पिठापासून बनवलेल्या गोष्टी आपल्या शरीराला हानी पोहोचवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या गोष्टींऐवजी मल्टीग्रेन ब्रेड आणि घरगुती पोळी किंवा पराठे अशा संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या वस्तू खा. त्याचप्रमाणे साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेह आणि लठ्ठपणा होऊ शकतो.
पांढऱ्या साखरेच्या जागी गूळ किंवा मध घाला. सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक्ड ज्यूसऐवजी नारळ पाणी, लिंबूपाणी किंवा ताज्या फळांचा रस प्या. तसेच समोसे आणि चिप्सऐवजी भाजलेले चणे किंवा ड्रायफ्रूट्स आपली सवय बनवा.
‘या’ गोष्टीही लक्षात ठेवा
नूडल्स आणि केक सारखे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ खाणे टाळा. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि जादा मीठ असते, जे शरीराला हानी पोहोचवू शकते. स्वयंपाकात रिफाइंड तेलाऐवजी मोहरी, ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल वापरा. पांढऱ्याऐवजी तपकिरी तांदूळ खा.
आहारात सेंधा मीठ वापरा
आहारात सेंधा मीठ वापरा. बाजारातील मिठाई वगळा आणि रवा शिरा किंवा गुळाची मिठाई यासारखे हलके आणि निरोगी घरगुती पदार्थ खा. रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि डाळींचा समावेश करा. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही निरोगी राहाल.
निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला चांगला आहार घेणं गरजेचं आहे. अनियमित जीवनशैली आणि खराब आहार हळूहळू आपल्या शरीराला आजारांचे घर बनवत आहे. त्यामुळे आम्ही वर सांगितलेल्या गोष्टी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास तुम्हाला आरोग्यदायी आहार मिळेल. नूडल्स आणि केक सारखे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी तुम्ही रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि डाळींचा समावेश करा.
( डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List