मीडियाला गुंगारा देत वाल्मीक कराडला CID ने मागच्या दाराने नेले?
बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणी फरार वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले. मात्र, तो शरण आल्यावर प्रसारमाधअयमांना गुंगारा देत त्याला मागच्या दाराने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे. त्याला सीआयडी ऑफीसमधून बाहेर काढल्याची माहितीही मिडीयाला देण्यात आली नाही. एवढी गुप्तता कशासाठी पाळण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
मागील काही दिवसांपासून सीआयडीची 13 वेगवेगळी पथके कराडच्या मागावर होती. बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु 22 दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत. सरपंच हत्या प्रकरणात सुदर्शन घुले यांच्यासह तिघेजण फरार आहेत. तर दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड मोकाट होता. त्याच्या शोधासाठी सीआयडीचे पथक धावपळ करत होते. मात्र, कराड सापडला नाही. अखेर मंगळवारी सकाळी कराड हा स्वतः पोलिसांना शरण आला. मात्र, मिडीयाला कोणतीही चाहूल न लागू देता त्याला मागच्या दाराने सीआयडी ऑफीसबाहेर काढण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List