चंद्राबाबू नायडू देशातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, संपत्ती ऐकून बसेल धक्का
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार चंद्राबाबू यांच्याकडे तब्बल 930 कोटींची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्सने त्यांच्या अहवालात ही माहिती दिली आहे,
चंद्राबाबू यांच्या खालोखाल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे देशातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे 332 कोटींची मालमत्ता आहे. तिसऱ्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजय यांच्याकडे 118 कोटी संपत्ती आहे. तर कर्नाटकचे सिद्धारामय्या असून त्यांच्याकडे 51 कोटींची मालमत्ता आहे.
ममता बॅनर्जींकडे सर्वात कमी संपत्ती
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे 15 लाख रुपयांची संपत्ती आहे. जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे 55 लाख संपत्ती आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List