Walmik Karad surrender – शरण येण्याची वेळ अन् ठिकाण वाल्मीक कराडनं ठरवलं; पोलीस आणि सीआयडीची नाचक्की

Walmik Karad surrender – शरण येण्याची वेळ अन् ठिकाण वाल्मीक कराडनं ठरवलं; पोलीस आणि सीआयडीची नाचक्की

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेला आणि खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला वाल्मीक कराड अखेर मंगळवारी सकाळी सीआयडी मुख्यालयात पोलिसांना शरण आला. वाल्मीक कराड एमएच 23, बीजी 2231 हा स्वत:च्या गाडीने सीआयडी मुख्यालयात आला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून वाल्मीक कराड फरार होता. गेल्या 23 दिवसांपासून तो पोलीस आणि सीआयडीलाही गुंगारा देत होता. तो शरण आला असला तरी यामुळे पोलीस आणि सीआयडीची नाचक्की झाली आहे. आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची 9 पथके आणि 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात होता. परंतु 23 दिवस उलटूनही हे आरोपी सापडले नाहीत. सरपंच हत्या प्रकरणात सुदर्शन घुले यांच्यासह तिघेजण अद्यापही फरार आहेत. तर दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड मोकाट होता. त्याच्या शोधासाठी सीआयडीचे पथक धावपळ करत होते. मात्र, कराड सापडला नाही. अखेर मंगळवारी सकाळी कराड हा स्वतः पोलिसांना शरण आला. शरण येण्याची वेळ आणि ठिकाणही त्यानेच ठरवले.

पोलीस आणि सीआयडी गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकले नाहीत – प्रकाश सोळंके

वाल्मीक कराड शरण आल्यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांनीही यावर भाष्य केले असून वाल्मीक कराडचे शरण येणे हे एक प्रकारे पोलीस आणि सीआयडीचे अपयश आहे. पोलीस आणि सीआयडी गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आरोपीने स्वत:हून समर्पण केले. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. प्रमुख आरोपीही फरार असून त्यांना तातडीने पकडणे आवश्यक आहे. त्यांना पकडले तरच दोन्ही गुन्ह्यांचा तपास लागू शकतो. त्यामुळे आरोपींना पकडून तपास पूर्ण करावा आणि त्यांना फाशी द्यावी ही सर्वांची मागणी आहे, असे प्रकाश सोळंके म्हणाले.

…तर मग पळाला कशाला! – खासदार बजरंग सोनवणे

दरम्यान, पुण्यातील पाषाण येथील सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराडने एक व्हिडीओ जारी केला असून त्यात त्याने, मी दोषी आढळलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीआयडीने पारदर्शक तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मी दोषी आढळलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे हे म्हणायला वाल्मीक कराडला 23 दिवस का लागले? संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पहिल्या-दुसऱ्या दिवशीच हे बोलायचे होते, बाहेर पळाला कशाला? असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला.

अनेक प्रश्न अनुत्तरित 

दरम्यान, वाल्मीक कराड याच्यावर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास बीड पोलीस करत आहेत. मात्र तरीही वाल्मीक कराड याने शरण येण्यासाठी सीआयडीचा पर्याय का निवडला? एवढे दिवस तो कुठे लपून बसला होता? पोलीस आणि सीआयडीचे हात त्याच्यापर्यंत का पोहोचू शकले नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सुरेश धस, संदीप क्षीरसागर सह्याद्रीवर

वाल्मीक कराड याच्या अटकेनंतर आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री निवासस्थानी पोहोचले आहेत. तिथे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धस आणि क्षीरसागर यांनीही हा मुद्दा विधानभवनात आणि बाहेरही लावून धरला होता.

Walmik Karad surrender – गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी ते अण्णा! वाल्मीक कराडचा दहशत माजवणारा प्रवास

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर
नारळाचे दूध फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे...
हॉटेलमध्ये बोलावलं अन्…, मी रात्रभर रडत होते; सात दिवस घरात कोंडून घेतलं, कपिल शर्माच्या ‘बुआ’नं सांगितला कास्टीग काउचचा अनुभव
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?