Year Ender: मनमोहन सिंग, रतन टाटा, झाकीर हुसेन; 2024 मध्ये ‘या’ दिग्गच व्यक्तींनी घेतला जगाचा निरोप
वर्ष 2024 संपायला आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दोन दिवसानंतर 2025 वर्षाची नवी पहाट होणार आहे. या सरत्या वर्षात मागे वळून पाहिलं, तर काही गोड आणि आंबट अनुभवही मिळाले. वर्ष 2024 मध्ये हिंदुस्थानाने बरंच काही मिळवलं आणि बरंच काही गमावलं सुद्धा. वर्ष 2024 हे आपापल्या क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांना गमावल्याबद्दलही स्मरणात राहील. राजकारण, संगीत, कला, चित्रपट, साहित्य, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती देशाने गमावल्या, याचबद्दल जाणून घेऊ…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि उद्योगपती रतन टाटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी निधन झाले. 1990 च्या दशकात देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या धोरणांनी हिंदुस्थानचे भविष्य बदलून टाकले. तसेच याच वर्षी औद्योगिक क्षेत्रातील दिग्गज रतन टाटा यांच्या निधनाने हिंदुस्थानच्या कॉर्पोरेट क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी हिंदुस्थानी व्यवसायाला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर नेले. रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले.
संगीत आणि कला क्षेत्रातही कधीही भरून न येणारे नुकसान झाले
या वर्षी संगीत आणि कलाविश्वातील मोठ्या व्यक्तींनीही जगाचा निरोप घेतला. तबला वादक झाकीर हुसेन (मृत्यू 15 डिसेंबर 2024), शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खान (मृत्यू 9 जानेवारी 2024), गझल गायक पंकज उधास (मृत्यू 26 फेब्रुवारी 2024), आणि भरतनाट्यम नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती (मृत्यू 3 ऑगस्ट 2024) यांनी जगाचा निरोप घेतला.
तर साहित्यविश्वात शायर मुनव्वर राणा (14 जानेवारी 2024), केकी एन दारूवाला (26 सप्टेंबर 2024), उषा किरण खान (11 फेब्रुवारी 2024) आणि मालती जोशी (15 मे 2024) या प्रसिद्ध व्यक्तींचे निधन झाले. चित्रपट जगताने श्याम बेनेगल (23 डिसेंबर 2024) आणि कुमार शहानी (24 फेब्रुवारी 2024) सारखे चित्रपट निर्माते गमावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List