विजयदुर्ग किल्ल्यावर “हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण” सोहळा संपन्न
गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, कोकण विभाग यांच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्यावर “हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा”चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थिती दाखवत “जय भवानी जय शिवराय” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, कोकण विभाग या संघटनेच्या माध्यमातून ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याच्या तोफगाडाचे लोकार्पण करण्यात आले. अनेक दिवसांपासून संघटनेतील सर्व सभासद या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. मोठ्या थाटामाठात तोफगाडा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी युवासने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. गड किल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला. “गड किल्ले संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या गड किल्ले संवर्धन संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जपायचे काम केले आहे. ही मोहीम हाती घेतलेल्या सर्वांचे मी कौतुक करतो. मी या व्यासपीठावर एक राजकीय नेता म्हणून आलो नसून मी एक शिवप्रेमी आहे म्हणून या ठिकाणी आलो आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या संस्थेच्या पाठीशी ठाम उभे राहायला हवे. आताच्या युवा पिढीला छत्रपती शिवरायांचा इतिहास समजण्यासाठी गड किल्ले जोपासले गेले पाहिजेत,” असे यावेळी यावेळी सुशांत नाईक म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार श्री कुणालदादा मालुसरे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्रीमान रघुजीराजे आंग्रे, सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज सरदार समिरराजे इंदलकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List