राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कुमार शेट्ये यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास उर्फ कुमार शेट्ये यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि सून असा परिवार आहे.
कुमार शेट्ये गेले काही दिवस आजारी होते. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रामनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान कुमार शेट्ये यांचे निधन झाले.
कुमार शेट्ये जनाधार असलेले राजकीय नेते होते. त्यांनी रत्नागिरी पंचायत समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. 1992 ते 1997 असे सलग पाच वर्ष ते सभापती होते. 1997 ते 2002 या कालावधीत ते जिल्हा परिषद सदस्य होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. दोन वेळा त्यांनी रत्नागिरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनाने रत्नागिरीवर शोककळा पसरली आहे.
शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली
कुमार शेट्ये यांच्या निधनाची बातमी कळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. कुमार शेट्ये यांचा मुलगा सूरज यांना एक पत्र लिहून शरद पवार यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. कुमार शेट्ये यांना प्रकृतीची समस्या असतानाही ते सार्वजनिक कामात माझ्या संपर्कात असायचे. कुमार शेट्ये यांच्यासारखा प्रामाणिक, विनम्र आणि निष्ठावान सहकारी जाणे ही माझ्यासाठी दुःखदायक घटना असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List