“माझा भूतकाळ फार वाईट”; ती हवी होती म्हणत…अर्जुन कपूर झाला भावूक

“माझा भूतकाळ फार वाईट”; ती हवी होती म्हणत…अर्जुन कपूर झाला भावूक

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या अभिनयाचं ‘सिंघम 3’ मध्ये खूप कौतुक झालं. अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलही तेवढाच चर्चेत असतो. त्याच्या आणि मलायकाच्या नात्याबद्दल त्यांच्या ब्रेकअपबद्दल प्रचंड चर्चा रंगल्या. तसेच अर्जुनने त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल मोकळेपणानेच बोलला आहे.

नुकतच तो त्याच्या अशा एका नात्याबद्दल बोलला ज्याबद्दल सांगताना तो भावूक झालेला पाहायला मिळाला. हे नात त्याच्या अत्यंत जवळच आणि त्याचा भक्कम आधार होता. ते नात म्हणजे त्याच्या आईसोबत असणारं.

आईच्या निधनावर भाष्य

अर्जुन कपूरची आई मोना यांचं निधन होऊन बराच काळ लोटला आहे. पण आजही तो क्षण अर्जुन कपूरसाठी खूप भावनात्मक आहे. त्यानं एका पॉडकास्टमध्ये त्याविषयी चर्चा केली. आईच्या निधनानंतर त्याने स्वत: ला कसं सांभाळलं आणि आयुष्यात तो पुढे जाण्याचा कसा प्रयत्न करतोय अजूनही तसेच आई गेल्यानंतर त्याने बहिणींना कशी साथ दिली या सगळ्याविषयी तो अगदी मोकळेपणाने बोलला. घरातील सगळ्यात मोठा मुलगा असल्यानं त्याला स्वत: ला सांभाळण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता असही त्याने म्हटलं.

“माझा भूतकाळ फार वाईट…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरनं त्याच्या आईला गमावण्याविषयी सांगितलं. तो म्हणाला, “तो काळ खूप कठीण होता. माझा भूतकाळ फार वाईट आहे, त्यात खूप ट्रॉमा आहे. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकांना असं का वाटतं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडणं हे सोपं असतं किंवा होतं. याशिवाय मला या गोष्टीवर देखील कोणती शंका नाही की आउटसाइडर्ससाठी या क्षेत्रात येऊन करिअर करणं किती कठीण असतं. पण तुम्हाला असं का वाटतं की जे आयुष्य मी जगतोय ते जगणं माझ्यासाठी फार सोपं आहे” असं म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

बोलताना अर्जुन कपूर भावूक

पुढे तो म्हणाला, ‘तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपू शकता. मी असं कधी करु शकत नाही. मी माझ्या आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपू शकत नाही. देवानं मला देखील काही भावना दिल्या आहेत. पण जे तुमच्याकडे आहे, ते माझ्याकडे नाही. पण यासाठी मी इर्शा करायला हवी का? तुमची आई आहे? मग मी तुमच्याविषयी वाईट विचार करायला हवा का? तुमच्याकडे असं काही आहे, जे माझ्याकडे कधीच नसेल. त्यासाठी मी कितीही प्रार्थना केली तरी देखील ती माझ्यासोबत राहणार नाही” आपल्या भावना व्यक्त करताना अर्जुन भावूक झालेला दिसला.

आई हवी होती म्हणत…

दरम्यान त्याच्यावर जेव्हा जबाबदारी पडली तेव्हा त्याने कसं सगळं सांभाळलं हे सांगताना तो म्हणाला, ‘मी एक स्वातंत्र्य असलेला व्यक्ती आहे. माझ्या आई-वडिलांनी देता येईल तितकी मदत केली. पाठिंबा दिला पण आर्थिकरित्या ज्या दिवसापासून मी काम करण्यास सुरुवात केली, त्या दिवसापासून सगळं काही मी स्वत: केलं. माझा पहिला पगार हा इश्कजादे चित्रपटामुळे मिळाला होता पण तेव्हा माझी आई हे जाणून न घेता गेली की माझं भविष्य या क्षेत्रात आहे. त्यानंतर मी माझ्या वडिलांकडून कधीच काही मागितलं नाही आणि यावर माझ्या आईलाही गर्व असेल.’

अर्जुनच्या या सर्व भावनांना पाहता तो त्याच्या आईच्या किती जवळ होता, त्याचं त्याच्या आईवर किती प्रेम होतं हे लक्षात येतं तसेच त्याच्या आईला जाऊन आता बराच काळ लोटला असला तरीही त्यातून तो अजूनहा सावरू शकलेला नाही हेही दिसून येत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
हिवाळा सुरु झाला अनेक आजार डोके वर काढतात. जसे फ्लू, सर्दी आणि खोकला किंवा घसा खवखवतो. तसेच सांधेदुखीचा देखील त्रास...
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल