नागा चैतन्यच्या आईने वडील नागार्जुनसोबतच्या घटस्फोटानंतर करोडपती व्यावसायिकासोबत थाटला संसार; कोण आहे हा बिझनेसमन? 

नागा चैतन्यच्या आईने वडील नागार्जुनसोबतच्या घटस्फोटानंतर करोडपती व्यावसायिकासोबत थाटला संसार; कोण आहे हा बिझनेसमन? 

नागा चैतन्यचे नुकतेच धुलीपालाशी दुसरं लग्न करून त्याने नवीन संसाराला सुरुवात केली आहे. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये या जोडप्याने लग्न केलं. तर नागा चैतन्य हा नागार्जुन आणि डी. रामनायडू यांची मुलगी लक्ष्मी दग्गुबती यांचा मुलगा आहे. चैतन्य लहान असताना त्याच्या आई-वडीलांनी घटस्फोट घेतला होता.
नागा चैतन्यच्या आईने केलं करोडपती व्यावसायिकाशी लग्न
नागा चैतन्यप्रमाणेच त्याच्या वडीलांचीही दोन लग्न झाली आहेत. नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबती यांनी घटस्फोटानंतर दोघांनीही दुसरं लग्न केलं. नागा चैतन्यची आई लक्ष्मी यांनी सर्वात श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न गाठ बांधली आहे.
लक्ष्मी आणि नागार्जुन यांचा घटस्फोट झाल्यानंतर नागार्जुनने अभिनेत्री अमलाशी दुसरं लग्न केलं. तर, नागा चैतन्यच्या आईनेही दुसरं लग्न केलंय. नागा चैतन्यच्या सावत्र वडिलांचं नाव शरत विजय राघवन आहे. नागार्जुन आणि लक्ष्मी वेगळे झाल्यानंतर दोघांनीही आपापले मार्ग निवडले. 1992 मध्ये नागार्जुनने अभिनेत्री अमालासोबत दुसरं लग्न केलं, तर लक्ष्मी दग्गुबतीने शरथ विजय राघवसोबत लग्न केलं.
कोण आहेत शरत विजय राघवन?
शरत विजय राघवन हे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह असून त्यांची हजारो कोटींच्या घरात संपत्ती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शरथ विजय राघवन आणि लक्ष्मी यांना एक मुलगा देखील आहे. नागा चैतन्यचे आपल्या सावत्र भावंडांशी चांगले संबंध असल्याचे म्हटले जाते.
लक्ष्मी आणि शरत विजय राघवन लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाले असून लक्ष्मीने तिथे ‘लक्ष्मी इंटिरिअर्स’ नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 244.4 कोटी आहे.
नागा चैतन्यचा दुसऱ्या लग्नात आईची उपस्थिती नव्हती 
नागा चैतन्यचा दुसऱ्या लग्नात संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं पण त्याची आई मात्र कुठेही दिसली नाही. नागा चैतन्यने शोभिता धुलीपालचा 8 ऑगस्ट 2024 रोजी  साखरपुडा झाला. या साखरपुड्यात मात्र त्याची पहिली आई उपस्थित होती.
दरम्यान नागा चैतन्यने शोभिता धुलीपालाशी 4 डिसेंबर 2024 ला दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये नागार्जुनची एक्स वाइफ लक्ष्मी अमलासोबत फॅमिली फोटो पाहिला मिळतो.
या फोटोमध्ये लक्ष्मी शोभिता आणि चैतन्यसोबत त्याची आई, शरथ विजयराघवनही त्यांच्यासोबत बसेल आहेत. तर सावत्र भाऊ आणि त्याची बायकोही या फोटोमध्ये आहे. पण त्याच्या आईची लग्नाला गैरहजेरी असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
समंथाचेही होते तिच्या पूर्वीच्या सासरशीही चांगले संबंध
जेव्हा नागा चैतन्यचं लग्न अभिनेत्री सामंथासोबत झालं होतं. तेव्हाही सामंथा आणि चैतन्य यांचा लक्ष्मी डग्गुबती आणि शरत विजय राघवन यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. समंथाचे तिच्या पूर्वीच्या सासरशीही चांगले संबंध होते. नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतरही समंथाने अभिनेता राणा दग्गुबतीसोबत जवळीक कायम ठेवलीय, असं सांगितलं जातं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’ कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
कल्याण पश्चिमेमध्ये भाजपचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामुळे कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण...
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल
मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न, या अभिनेत्रीला मिळाली भयानक शिक्षा; समाजानं वाळीत टाकलं, मंदिरातही प्रवेश नव्हता
अल्लू अर्जुन अखेर संतापला; गैरवर्तन करणाऱ्यांना थेट इशारा; म्हणाला “असं करणं थांबवलं नाहीतर…”
फेरी बोट नदीत उलटली, 38 जणांना जलसमाधी; 100 हून अधिक लोक बेपत्ता