Karisma Kapoor: हिच्या कानाखाली का नाही मारत…, नवरा आणि सासूकडून करिश्मावर व्हायचे अत्याचार?

Karisma Kapoor: हिच्या कानाखाली का नाही मारत…, नवरा आणि सासूकडून करिश्मावर व्हायचे अत्याचार?

Karisma Kapoor Marriage: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर कायम तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी, पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आज करिश्मा दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. पण अभिनेत्रीच्या वैवाहित आयुष्यात असा देखील एक दिवस होता, जेव्हा करिश्माने अनेक संकटांचा सामना केला. 2003 मध्ये उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न झाल्यानंतर करिश्मा बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेत, कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं. पण अभिनेत्री लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी लग्नाच्या 13 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर करिश्मासोबत जे काही झालं ते अत्यंत धक्कादायक होतं.

करिश्मा आणि संजय यांचं नातं कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर अभिनेत्री पतीवर अनेक गंभीर आरोप केलं. संजय हा हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा यावर देखील करिश्माने मोठा खुलासा केला होता. शिवाय अभिनेत्रीने तिच्या सासूबद्दलही धक्कादायक खुलासा केला होता. एकदा करिश्मा हिला एक ड्रेस घातल्यानंतर फिट होत नव्हता. तरी देखील करिश्माने तोच ड्रेस घालावा अशी तिच्या सासूची इच्छा होती. यावर संजय म्हणाला आईला म्हणाला होता, ‘हिच्या कानाखाली का नाही मारत…’

करिश्माने असंही सांगितलं की, लग्नाआधी संजय आपल्या भावासोबत बसून लग्नानंतर करिश्मा किती पैसे आणेल याचा हिशोब करायचे. लग्नाआधी एकदा संजयच्या आईने करिश्माच्या वडिलांना रडवलं देखील होतं… संजय आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल अभिनेत्रीने मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता.

करिश्मा म्हणाली होती, ‘जेव्हा आम्ही हनीमूनसाठी गेलो होतो. तेव्हा संजय याने त्याच्या मित्रांसोबत माझ्यावर बोली लावली होती. त्याने माझ्यावर मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेव… अशी बळजबरी केली होती. पण जेव्हा करिश्माने नकार दिला तेव्हा संजय याने अभिनेत्रीला मारहाण केली…

एवढंच नाही तर, संजय याने देखील करिश्मावर गंभीर आरोप केले होते. करिश्माने माझ्यासोबत फक्त आणि फक्त पैशांसाठी लग्न केलं. संजय या वक्तव्यावर करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी संताप व्यक्त केला होता. ‘आमची प्रतिष्ठा सर्वांना माहीत आहे, आम्ही कपूर आहोत. संजय हा थर्डक्लास माणूस आहे…’ असं देखील रणधीर कपूर म्हणाले होते.

लग्नानंतरही पहिल्या पत्नीशी संबंध

करिश्मा कपूर ही संजय याची दुसरी पत्नी होती. पण अभिनेत्रीला दुसरी पत्नी म्हणून अनेक संकटांचा सामना करावा लागला. करिश्मा सोबत दुसरा संसार थाटल्यानंतर देखील संजय याचे पहिल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध होते. करिश्माला वैवाहिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. तेव्हा करिश्मा प्रेग्नेंट होती. करिश्मा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?