समाजभान – संसाराचे नवे गडी

समाजभान – संसाराचे नवे गडी

>> अश्विनी पारकर

‘अगर वो मेरी अच्छी दोस्त नही हो सकती तो मैं उससे प्यार कर ही नही सकता’ हा ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातल्या  संवादाने कित्येक तरुण-तरुणी आजही घायाळ होतात. पण पाश्चात्य देशातून तसेच जपानमधून भारतात येऊ घातलेली फ्रेंडशिप मॅरेज ही संकल्पना याहून फार वेगळी आहे. या संवादाप्रमाणे त्यात प्रेमाचा लवलेशही नाही.

काय आहे फ्रेंडशिप मॅरेज?

मैत्री विवाह हा असा विवाह आहे ज्यामध्ये तुमची मूल्ये, आवडीनिवडी, स्वभाव, आर्थिक बाबी, कौटुंबिक बाबी या जुळतायत का हे प्रथम पाहिले जाते. या नात्याला भावनांची जोड अजिबात नसते. भावनिक जवळकीशिवाय हे नाते जुळवले जाते. यानंतर विवाह होतो, पण यात लैंगिक संबंध किंवा रोमान्स याला अजिबात जागा नसते. एखाद्या रुममेटसोबत आपण राहतो तसे विवाहित जोडपे एकमेकांसोबत राहतात. पुढे जाऊन मूल होऊ देण्याचा विचार करत नाहीत आणि विचार केलाच तर दत्तक घेऊन किंवा कृत्रिम पद्धतीने मुले होतात. यामध्ये जोडीदार लग्न झालेले असताना दुसऱया व्यक्तीसोबत संबंध ठेऊ शकतो. अगदी प्रेमसंबंधही ठेऊ शकतो आणि हे परस्पर संमतीने असते. लग्नाच्या आधीच कामांचे आणि आर्थिक बाबींचे वाटप केलेले असते. पाश्चिमात्य देशात बरेचदा लग्नाच्या दबावापोटी केवळ तडजोड म्हणून हे नाते निर्माण केले जाते आणि याचे प्रमाण जास्त आहे.

पण भारतात हे यशस्वी होईल का?

याबाबत मत व्यक्त करताना मॅरेज काऊन्सिलर लीना कुलकर्णी म्हणतात, “मुळातच आपण भारतीय भावनिक आहोत. हजारो वर्षांपूर्वीची लग्न संस्था आतापर्यंत टिकली आहे यामागे ही लग्न संस्था किती मजबूत आहे हे लक्षात येते. अशा पद्धतीची संकल्पना येथे टिकायला अडचणी आहेत. कारण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की, आजकालची पिढी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी असली तरी एकमेकांवर आपण अवलंबून आहोत याचा स्वीकार आपण केला पाहिजे. ‘मिळून साऱयाजणी’ मासिकाच्या संपादिका विद्याताई बाळ यांनी अशा प्रकारची संकल्पना राबवली होती. ज्यात आवडीनिवडी, स्वभाव, व्यक्तिमत्व या निकषांवर तरुण-तरुणींना आम्ही जोडीदार निवडायची संधी दिली होती. इंटरनेट विवाहाच्या जमान्यानंतर ही संकल्पना मागे पडली.  त्यातून अनेक तरुण-तरुणींची यशस्वी लग्ने झाली आहेत. पण लग्नानंतर एकमेकांमध्ये भावनिकरित्या न गुंतणं हे मला शक्य वाटत नाही.’’

मानसशास्त्रज्ञ अपर्णा चव्हाण यांचं मत लीना कुलकर्णी यांच्या मताशी सहमती दर्शवणार आहे. त्या म्हणतात, “फ्रेंडशिप विवाह कंपॅटिबिलिटी आणि एकमेकांशी जुळवून घेण्यात यशस्वी जरी ठरले तरी रोमॅँटिक स्पार्क म्हणजे प्रेम नात्याचा आनंद नसल्यामुळे ते काही काळानंतर अयशस्वी ठरू शकतात. प्रेमाच्या कमतरतेमुळे या नात्यांमध्ये पुढे जाऊन गैरसमज होण्याची शक्यता असते.’’

याबाबत एक मतप्रवाह असाही आहे जो मनोचिकित्सक डॉ. शुभांगी पारकर यांच्या शब्दांतून व्यक्त होतो. त्या म्हणतात, “अशा प्रकारच्या लग्नांमध्ये बांधिलकी राहते. पारंपरिक लग्नांमध्ये इतर नात्यांचा दबाव असू शकतो. फ्रेंडशिप मॅरेजमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की, त्यात अडकलेपण नाहीये. याच्यामध्ये काही मागण्या नाहीत, एकमेकांकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे फ्रेंडशिप मॅरेज पुढे नेणं जोडप्याला शक्य होऊ शकतं. यामध्ये जोडप्यात एकमेकांचाही एकमेकांवर दबाव नसतो. त्यामुळे हे नातं टिकू शकतं.’’

या सर्व तज्ञांच्या मतमतांतरातून एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे फ्रेंडशिप मॅरेज ही स्वागतार्ह संकल्पना आहे. भारतातील विवाह संस्थेला मजबूत पाया आहे. त्यात अडचणी जरी असल्या तरी अशा पद्धतीने लग्न जुळवून पुढे त्याचे रूपांतर रोमँटिक लग्नात झाले तर ही संकल्पना विवाहइच्छुक जोडप्यांना आणि त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा असणाऱया माता-पित्यांना दिलासा देऊ शकते हे नक्की.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
हिवाळा सुरु झाला अनेक आजार डोके वर काढतात. जसे फ्लू, सर्दी आणि खोकला किंवा घसा खवखवतो. तसेच सांधेदुखीचा देखील त्रास...
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल