राज्यातील महत्वाच्या घडामोडी
नीलकमल बोट दुर्घटनेतील बालकाचा मृतदेह सापडला
भर समुद्रात करंजा येथे भीषण अपघात झालेल्या नीलकमल या प्रवाशी बोटीवरील जोहान निसार अहमद या सात वर्षांच्या बेपत्ता मुलाचा शोध आज अखेर लागला. दुर्घटनाग्रस्त नीलकमल बोटीच्या खालच्या बाजूला जोहानचा मृतदेह अडकला होता. तो आज बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जे.जे. इस्पितळात पाठवण्यात आला. नीलकमल या प्रवाशी बोटीला अपघात झाल्यापासून जोहान अहमद हा सात वर्षांचा मुलगा बेपत्ता होता. घटना घडून तीन दिवस लोटले तरी त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी देरकर
शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता संपर्कप्रमुखपदी आमदार संजय देरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात बदल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात बदल करण्यात आला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या बदलांमध्ये संदीप गिन्हे – जिल्हाप्रमुख – (विधानसभा – चंद्रपूर, बल्लारपूर), मुकेश जीवतोडे – जिल्हाप्रमुख – (विधानसभा – राजूरा, वरोरा-भद्रावती) आणि रवींद्र शिंदे – जिल्हाप्रमुख – (विधानसभा – चिमूर, ब्रह्मपुरी) या पदांचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List