सत्याचा शोध – पार्वती मातेची करणी

सत्याचा शोध – पार्वती मातेची करणी

>> चंद्रसेन टिळेकर

‘ऐसे नवसाये कन्या-पुत्र होती तर का करावा लागे पती’ म्हणणारे संत तुकाराम आताच्या काळातही हवे होते अशी वाटणारी परिस्थिती आजही आहे. केवळ अशिक्षित ग्रामीण वर्ग नव्हे तर समाजाच्या सर्वच स्तरात अशी परिस्थिती असेल तर आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत अजून बराच पल्ला गाठावयाचा आहे, हे लक्षात येते.

‘सत्याचा शोध’ या सदरात मी केवळ घडलेले किस्से, कथा सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही गोष्टी अशा असतात की कुणाचा त्यावर सहसा विश्वास बसू नये. माझ्याही बाबतीत एकदा असेच घडले. शेतीच्या कामासाठी मी नेहमीप्रमाणे माझ्या गावी म्हणजे देहूला एशियाडने चाललो होतो. माझ्या हातात नुकताच प्रसिध्द झालेला अत्रे कट्टय़ाचा विशेषांक होता. तो वाचण्यात मी दंग असता माझ्या लक्षात आले की, आपल्या बाजूला जी तरुणी बसलीय ती वारंवार अंकात डोके घालतेय. मला वाटले प्रवासात तिला काही तरी वाचायला हवे असेल. म्हणून मी वाचण्याचे थांबवून तिला म्हणालो,

‘आपल्याला वाचायला हवा आहे का? हा घ्या, मी नंतर वाचीन.’ तसे ती मला म्हणाली, ‘नाही, वाचायला नकोय. पण मला एवढंच विचारायचं होतं की, हा अत्रे कट्टा कुठे भरतो आणि त्यावर कोणालाही बोलता येतं का?’

मी म्हटले, ‘तसा तो अनेक ठिकाणी भरतो. म्हणजे पार्ले, गोरेगाव, बोरिवली, ठाणे…’
‘कुर्ल्याला कुठे असतो का?’
मी म्हटले, ‘अजून तिथे कोणी पुढे आलेलं नाही. पुढे कधीतरी पाहू… काही विशेष आहे का?’
‘हो मला बोलायचं होतं एका विषयावर.’
‘कोणत्या हो?’
तशी ती तरुणी गप्पच झाली. मी तिला म्हटले,

‘अहो, तुम्ही बिनधास्तपणे मला सांगा. कारण तुम्ही त्या अत्रे कट्टय़ाच्या मूळ संस्थापकाशीच बोलत आहात,’ असे बोलल्यावर त्यांच्या चेहऱयावर हलकेसे स्मित उमटले. त्यांनी मला जी त्याची कहाणी सांगितली ती ऐकून चकितच झालो. त्या म्हणाल्या, ‘मी डॉ.स्वाती भोसले, स्त्राrतज्ञ म्हणून कुर्ल्याजवळील एका झोपडपट्टीत माझा दवाखाना आहे. तो अलीकडे चालेनासा झाल्यामुळे पुण्याला धनकवडी येथे माझ्या वडिलांनी दवाखान्यासाठी जागा पाहिली आहे. तीच पाहायला चाललेय.’

‘दवाखाना अचानक बंद झाला, की आधीपासूनच चालत नव्हता?’
‘नाही हो, खूप चांगला चालला होता. पण गेले पाच महिने बायका येण्याचं प्रमाण बरंच घटलं आहे.’
‘तुम्ही फी वाढवली असेल!’
‘मुळीच नाही. त्या बायका आर्थिकदृष्टय़ा तशा निम्न स्तरातीलच आहेत. तिथे फी माफकच ठेवावी लागते.’
‘मग झालं तरी काय?’

काही वेळ स्तब्ध होऊन नंतर म्हणाल्या, ‘मी स्त्राr रोग तज्ञ असल्याने गरोदर स्त्रियाही प्रसूतीपूर्व तपासणीसाठी माझ्याकडे यायच्या. त्याप्रमाणे गेल्या चार पाच महिन्यांत पाच-सहा स्त्रिया माझ्या दवाखान्यात तपासणीसाठी आल्या होत्या. मी त्यांना तपासलं आणि त्या सगळ्या बायकांना परखडपणे सांगितलं की, तुमचा काही तरी गैरसमज झालाय. तुम्हाला मुळीच दिवस गेलेले नाहीत. परंतु त्यांचा माझ्या सांगण्यावर विश्वासच बसला नाही. त्यांचं म्हणणं होतं की गर्भारपणाची सर्व लक्षणे आम्ही अनुभवत आहोत. म्हणजे सकाळचं मळमळणं, उलटीची भावना होणं, पाय जड झाल्यासारखं वाटणं. अहो, आम्हाला कितीतरी दिवस पाळीही आलेली नाही आणि तुम्ही सांगता, आम्ही गरोदर नाही म्हणून?’ एवढं बोलून त्या बायका थांबल्या नाहीत तर आपापल्या वस्तीत जाऊन त्यांनी सांगितलं की या भोसले बाई कुमारिका आहेत. त्यांचे लग्न झालेले नाही. त्यांना गर्भारपणातलं काय कळणार? त्यांच्याकडे जाऊ नका. साहजिकच माझ्याकडे स्त्रिया यायच्या थांबल्या. बहिष्कार टाकला असेच म्हणा ना! शेवटी मी त्यातल्या एका बाईला विचारलं, तुम्हाला हे असं का वाटतंय? तशी ती म्हणाली, मूल होत नाही म्हणून आम्ही काही बायका राजकोटच्या पार्वती मातेकडे गेलो होतो. तिच्या आशीर्वादाने हमखास मुले होतात असं आमच्या वस्तीत पसरलं होतं. अजूनही काही बायका तिकडे जातात. पण तुम्हाला वाटतं की, आम्हाला भ्रम झालाय म्हणून. हजारो बायका पार्वती मातेकडे जातात ते काय उगाच?’

मी तिला विचारलं, ‘ते ठीक आहे, पण तुम्ही दिवस गेल्यावर तीन चार महिन्याने का आलात? आधीच का आला नाहीत.’ तसे ती म्हणाली, आम्हाला पार्वती मातेने निक्षून सांगितलं होते की, माझ्यावर अविश्वास दाखवून तुम्ही खासगी दवाखान्यात चेकिंगसाठी गेलात तर गर्भ जिरून जाईल. मग माझ्याकडे यायचं नाही. तिने आम्हाला पिण्यासाठी औषधही दिलं होतं.’
एवढं सगळं सांगून झाल्यावर भोसले बाई मला म्हणाल्या,

‘आता बोला!’
मी म्हटलं, ‘हे सगळं आश्चर्यकारकच आहे किंबहुना अविश्वसनीयच आहे, पण अत्रे कट्टय़ावर काय विषय मांडायचाय आपल्याला?’
‘हेच तर सांगायचंय की, या आणि असल्या बाबा-बुवांवर विश्वास ठेवू नका.’
मी त्यांना हसून म्हणालो, ‘अहो आमच्या पार्ल्याच्या कट्टय़ावर यायची मुळीच गरज नाही. तिथे येणारा स्त्राr वर्ग सुशिक्षितच असतो. त्यांना हे सांगण्याची गरजच नाही.’ तशा त्या माझ्याकडे रोखून पाहात म्हणाल्या,
‘चुकताय तुम्ही. माझ्याकडे त्या सहा स्त्रिया आल्या होत्या ना त्यातल्या तीन बी.ए., बी.एड. झालेल्या शिक्षिका होत्या.’

मी खरं तर कपाळावर हात मारून घेणार होतो, पण तसे केले नाही, कारण मला आठवलं की, पूर्वी आमच्या वसाहतीतील माध्यमिक विद्यालयाच्या चार शिक्षिका खास टॅक्सी करून दर गुरुवारी वांद्रय़ाला एका बापूचे प्रवचन ऐकायला जायच्या. बोलता बोलता देहूगावचा फाटा आला. मी डॉक्टर बाईंचा निरोप घेऊन गावी शेतावर आलो. तिथे दोन गडय़ांपैकी एकच गडी हजर होता. दुसरा कुठे गेला हे त्याला विचारल्यावर त्याने सांगितले की, तो आपल्या बायकोला घेऊन आळंदीजवळच्या मरकळ गावी गेलाय. तिथे ताई महाराज नावाची एक म्हणे साध्वी आली आहे; ती जिला मूल होत नाही तिच्या पोटावर हात फिरवून मुलगा किंवा मुलगी देते. म्हणजे मुलगा पाहिजे असल्यास डावीकडून उजवीकडे हात फिरवते. मुलगी पाहिजे असल्यास उजवीकडून डावीकडे हात फिरवते. विशेष म्हणजे त्या ताई महाराज बाईचे दर्शन घेता यावे म्हणून आमच्या राज्य सरकारने खास एसटी गाडय़ा सोडल्या होत्या आणि हे कुठे घडत होतं तर, ‘ऐसे नवसाये कन्या-पुत्र होती तर का करावा लागे पती’ म्हणणाऱया तुकोबांच्या गावच्या परिसरात!

नंतर अर्थातच ‘अंधश्रध्दा निर्मूलन समिती’ने त्या ताई महाराज बाईचे बिंग फोडून तिला कारावासाचा रस्ता दाखवला. हा लेख लिहून झाल्यावर सहज टीव्ही लावला तर अनिरुध्द नावाचा एक बाबा सांगत होता की, ‘ज्या स्त्राrला मूल होत नसेल तिला गहू मिक्स केलेले गाईचे शेण खायला द्या, हमखास मूल होईल.’
कपाळावर हात तरी किती वेळा मारायचा?

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?