52 वर्षीय महिलेने पोहत गाठले 150 किमी अंतर
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिह्यातील गोली श्यामला (52) या महिलेने ऐतिहासिक कामगिरी करताना पोहत 150 किलोमीटर अंतर पार केले. तिने विशाखापट्टणम ते काकीनाडापर्यंत समुद्रातून पोहत प्रवास केला. 28 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेला तिचा प्रवास शुक्रवारी, 3 जानेवारी 2025 रोजी संपला. श्यामला हिने प्रतिदिन 30 किमी अंतर पूर्ण केले. याआधीही तिने पोहण्याच्या बाबतीत अनेक विक्रम नोंदकले आहेत.
दरम्यान, यापूर्की राम सेतु, श्रीलंका आणि लक्षद्वीपच्या समुद्रात डुबकी मारून तिने सर्कांनाच अवाक् केले. 150 किमी पोहणाऱ्या श्यामलाचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तोंडभरून कौतुक केले. ’श्यामलाने अनेक आव्हानांचा सामना करत सहा दिवस पोहत अंतर पूर्ण केले. तिचा हा प्रवास म्हणजे नारी शक्तीचे एक ज्कलंत उदाहरण असून तिने तिच्या कार्याने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी ’एक्स’ पोस्टमध्ये म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List