पाणीपुरीवाला वर्षाला कमावतो 40 लाख
तामीळनाडूमध्ये एका पाणीपुरीवाल्याच्या कमाईने साऱ्यांना धक्का दिला आहे. पाणीपुरीवाल्याने यूपीआयद्वारे पेमेंट घेण्यास सुरुवात केली होती. त्याने ऑनलाईन पेमेंटद्वारे वर्षाला 40 लाख रुपये कमावल्याचे समोर आले आहे. त्यात रोख पैशांचा हिशेब वेगळाच आहे. त्याला या रकमेवर जीएसटी विभागाची नोटीस आली आहे. संजीव गोयल या व्यक्तीने एक्सवर ही नोटीस पोस्ट केली आहे. नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख आहे. पाणपुरीवाल्याकडे 2023-24 या आर्थिक वर्षातील व्यवहार मागवण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List