आज ममता दिन
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 94 वा जन्मदिन म्हणजेच ममता दिन 6 जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त शिवतीर्थ येथे उद्या सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीने सुगम संगीत व भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ममता दिनानिमित्त राज्यभरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दादरमध्ये शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सिद्धिविनायक सुगम संगीताचे गुणी कलाकार रविराज नर, राजा कदम, रमेश राणे, सुदेश पवार, हर्षदा वेल्हाळ, स्मिता तायशेटे, श्रेया ताम्हणकर, सुहास जयवंत आदी भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमांच्या दुसऱया सत्रात आर्यादुर्गा भजन मंडळ, दादर आणि दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ दादर या संस्थांच्या वतीने भजन गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली.
रमाधाममध्येही कार्यक्रम
खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात भजन, कीर्तन आणि माँसाहेबांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List