हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना भरधाव कार झाडाला धडकली, तिघे ठार; दोन गंभीर जखमी
मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना भरधाव कार झाडाला धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. जळगावमधील सावदा ते पिंपळ रोडवर ही घटना घडली. जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रावेर येथील पाच मित्र भुसावळला मित्राच्या बहिणीच्या हळदीला गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून रावेरला परतत असतानाच सावदा मार्गावर त्यांची कार झाडावर आदळली. यात कारमधील तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
शुभम सोनार, मुकेश रायपूरकर अशी मयतांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटू शकली नाही. तर जयेश भोई आणि गणेश भोई अशी जखमी मित्रांची नावे आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List