मायरा वायकुळला मोठी ऑफर; ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

मायरा वायकुळला मोठी ऑफर; ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय झालेली बालकलाकार मायरा वायकुळ लवकरच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात ती झळकणार आहे. पुढच्या वर्षी 31 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे या चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आलं. यावेळी मायरा वायकुळ, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते.

एसीडी कॅटचे मनीष कुमार जयस्वाल आणि साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. किमया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश कुमार जयस्वाल, किर्ती जयस्वाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार – महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलं आहे.

अल्पावधीतच जगभरात पोहोचलेल्या मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात मायराच्या वाट्याला आलेली भूमिका काय आहे? सोशल मीडियावर सुरु असलेल्या पोस्टकार्डच्या प्रमोशनचा चित्रपटाशी नक्की कसला संबंध आहे? हे जाणून घेण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

52 वर्षीय महिलेने पोहत गाठले 150 किमी अंतर 52 वर्षीय महिलेने पोहत गाठले 150 किमी अंतर
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिह्यातील गोली श्यामला (52) या महिलेने ऐतिहासिक कामगिरी करताना पोहत 150 किलोमीटर अंतर पार केले. तिने विशाखापट्टणम...
फक्त बॉर्डर यांच्याच हस्ते करंडक प्रदान, सुनील गावसकरांची नाराजी
पत्नीने बुरखा न घालणे हा घटस्फोटाचा आधार नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
विजयानंतरही मुंबईचे आव्हान संपुष्टात, आयुष म्हात्रेचे आणखी एक शतक; महाराष्ट्र, विदर्भ उपांत्यपूर्व फेरीत
दिंडोशीतील पाणी समस्येबाबत शिवसेनेचा महापालिकेवर आज जनप्रक्षोभ मोर्चा
लोटे एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रिया न करताच कोतवाली खाडीत
फॉलोऑननंतर पाकिस्तानी फलंदाजी ट्रकवर