अरेच्चा! शाहिद-करीनाला एकत्र पाहून चाहते खुश; म्हणाले Jab They Met
अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी होती. या दोघांच्या ब्रेकअपनंतर चाहतेसुद्धा बरेच नाराज झाले होते. मात्र आता बऱ्याच वर्षांनंतर शाहिद-करीना एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसले.
मुंबईतील धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमाला या दोघांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकतात. त्यामुळे वार्षिक कार्यक्रमाला असंख्य सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली.
या वार्षिक कार्यक्रमात करीना आणि सैफ अली खान ज्या रांगेच बसले होते, त्याच्या मागेच शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूतसोबत बसलेला दिसून आला. त्यामुळे आता या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List