हिंदुस्थानातील अंड्यांची आयात ओमानने रोखली, तामीळनाडूतील पोल्ट्री उद्योगाला मोठा धक्का
ओमानने हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या अंड्यांना नवीन परवाना देणे बंद केले आहे. यामुळे तामीळनाडूतील नमक्कल येथील पोल्ट्री उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच कतारने हिंदुस्थानातील अंड्यांच्या वजनाबाबत काही अटी ठेवल्या होत्या. आता कतारने नवीन परवाना देणे थांबवले आहे.
डीएमकेचे खासदार केआरएन राजेश कुमार यांनी मंगळवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. देशातून अंड्यांची आयात पुन्हा सुरू करावी म्हणून केंद्र सरकारने कतार आणि ओमानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी राजेश कुमार यांनी केली.
याविषयी राजेश कुमार म्हणाले, मी पोल्ट्री शेतकरी आणि अंड्यांच्या निर्यातीत येणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी हिंदुस्थानात ओमान आणि कतारच्या राजदूतांसोबत बैठक घेण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी नमक्कलचे अंडी निर्यातदार, पशुधन आणि कृषी शेतकरी – व्यापारी संघटनेचे सरचिटणीस पी.व्ही. सेंथल यांनी ओमानच्या बंदीमुळे 15 कोटी रुपयांची मोठी खेप अडकल्याचे सांगितले. आकडेवारीनुसार या वर्षातील सुरुवातीला ओमान, कतार, दुबई, अबुधाबी, मस्कट, मालदीव आणि श्रीलंकासह विविध देशांत 11.4 कोटी अंडे निर्यात करण्यात आले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List