R Ashwin Retirement – ‘माझ्या मुलाचा अपमान केला…’ अश्विनच्या निवृत्तीनंतर वडिलांचे खळबळजनक वक्तव्य
टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बुधवारी (18 डिसेंबर 2024) निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. गॅबा कसोटी अनिर्णित झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्याने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्याने अचानक निवृत्ती घेतल्यामुळे चाहत्यांसह त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा धक्का बसला. अशातच माझ्या मुलाचा अपमान केला गेला, असे खळबळजनक वक्तव्य अश्विनच्या वडिलांनी केले आहे.
सामनाचे अधिकृत WhatsApp चॅनेल फॉलो करा! Follow: https://www.saamana.com/whatsapp
रविचंद्रन अश्विनने आपल्या 14 वर्षांच्या करिअरला ब्रेक लावत वयाच्या 38 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. बॉर्डर गावस्कर करंडक सुरू असतानाच अश्विनने निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे त्याच्या निवृत्ती संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मालिकेमध्ये अश्विन एडलेड येथे झालेल्या पिंक बॉल कसोटीमध्ये खेळला होता. परंतु त्याला पहिल्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे अश्विनच्या निवृत्तीवर वडिलांनी आश्चर्य व्यक्त करत माझ्या मुलाचा अपामन केल्याचे म्हटले आहे.
Ashwin Retirement – “माझ्यातला पंच अजूनही बाकी आहे…” निवृत्तीनंतर आर. अश्विनचे मोठे वक्तव्य
मलाही अखेरच्या क्षणी त्याच्या निवृत्ती संदर्भात माहिती मिळाली. निवृत्ती घेणे त्याचा निर्णय आहे. मी त्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाही. परंतु ज्या प्रमाणे त्याने निर्णय घेतला, त्याची अनेक कारण असू शकतात. आता ते फक्त अश्विनलाच माहित. बहुतेक अपमानामुळे त्याने असा निर्णय घेतला असावा, असे रविचंद्रन म्हणाले आहेत. त्यांनी अश्विनच्या निवृत्तीने समर्थन केले परंतु त्याने अजून टीम इंडियासाठी खेळायला पाहिजे होते, अशी इच्छाही त्यांनी बोलताना व्यक्त केली. न्यूज 18 या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List