देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे पाहून हात जोडले; म्हणाले, कृपया…
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. निवडणूक जिंकण्यासाठी व्होट जिहाद करता. एक व्यक्ती येतो 17 मागण्या करतो. तुम्ही त्या वाचतही नाही. तुमच्या देशभक्तीवर माझा संशय नाही. आपण वैचारिक विरोधक आहोत. पण विरोधक आपल्या खांद्यावर कुणाला तरी बंदूक ठेवायला देतात, याचं वाईट वाटतं. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
निवडणूक जिंकण्यासाठी व्होट जिहाद करता. एक व्यक्ती येतो 17 मागण्या करतो. तुम्ही त्या वाचतही नाही. तुमच्या देशभक्तीवर माझा संशय नाही. आपण वैचारिक विरोधक आहोत. पण विरोधक आपल्या खांद्यावर कुणाला तरी बंदूक ठेवायला देतात, याचं वाईट वाटतं.
भारत जोडो अभियानावर मी बोललो, माझ्यावर टीका केली. मी आज पुराव्यानिशी बोलतो. या अभियानात कोण आहे बघा. या देशात आपण नक्षलवादाच्या विरोधात लढाई पुकारली. नक्षलवाद्याचा संविधान, लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना समांतर सरकार हवं आहे. या नक्षलवाद्यांच्या विरुद्ध मोठी लढाई सुरू झाली. त्यामुळे आम नक्षलवादी संपायला लागले. त्यावेळी हा नक्षलवाद सेफ झोन शोधायला लागला, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आर आर पाटील यांच्या काळात 48 संघटनांची यादी होती, त्या ग्रामीण आणि शहरी भागात सक्रिय असल्याची नोंद आहे. लोकसभेतही १८ फेब्रुवारी २०१४ रोजी मनमोहन सिंगाचं सरकार असताना 72 फ्रंटल संघटनांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यातील सात महाराष्ट्रातील आहेत. त्या तुमच्या भारत जोडोच्या यादीत आहे. महाराष्ट्राच्या एटीएसने त्यावेळी जी माहिती पाठवली होती. लोकसभेत गेलेली ही माहिती आहे, ती माझ्याकडे आहे. त्यात एकूण ४० संघटनांची नावे आहेत. त्यातील १३ संघटना भारत जोडोत काम करत आहेत. तुमच्या देशभक्तीवर प्रश्न नाही. पण निवडणूक जिंकण्यासाठी आपण कुणाचा वापर करत आहोत. कोण आपला खांदा वापरत आहोत याचा विचार केला पाहिजे.
आपण तिसरी आर्थिक शक्ती होत आहोत. अनेक देशांना आनंद नाहीये. त्या देशांना या देशात कारवाई करायची आहे. हात जोडून विनंती करतो कृपया तुमचा खांदा वापरू देऊ नका. कदाचित आमचाही खांदा वापरण्याचा प्रयत्न करतील. एकदा वाजेपयी म्हणाले होते सरकार येतील जातील. पण हा देश , लोकशाही आणि संविधान राहिलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List