अंकिता लोखंडेचं खरं नाव माहितीये का? नाव बदलण्याचं आहे खास कारण
आपण हे बऱ्याचदा ऐकलं असेल की अनेक कलाकारांनी फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी त्यांची नावे बदलली. तर अनेकांनी नावांच्या स्पेलिंगही बदलल्या. त्यामागे त्यांची अनेक कारणे असतात. पण तुम्हाला माहितीये अजून एक अभिनेत्री आहे जिने सिने इंडस्ट्रीत येण्यासाठी आपलं नाव बदललं आहे. हो अंकिता लोखंडचे अंकिता हे खरं नाव नाही आहे. तिच खरं नाव हे वेगळं आहे.
अंकिता हे टोपण नाव
झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे. त्यानंतर रिॲलिटी शो, टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन तिने केलं. अंकिताचे खरे नाव हे अंकिता नाहीये तर वेगळच आहे.
इंदौरमध्ये एका मराठी कुटुंबात अंकिताचा जन्म झाला आहे. अंकिता लोखंडेचे खरे नाव तनूजा आहे. इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तिने आपले नाव बदलले होते. अंकिता हे तिचे टोपण नाव होते आणि तिच्या जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक तिला अंकिता नावाने हक्क मारायचे.
त्यावरून अंकिताने ठरवलं की तिला तिच्या टोपण नावाने इंडस्ट्रीमध्ये ओळखलं जाईल. त्यानंतर तिने तनूजाचे अंकिता केले. तेव्हापासून तिचे नाव अंकिता लोखंडे पडलं ते आजतागायत तिचे नाव अंकिता लोखंडेच आहे.
एअर होस्टेस बनायचं होतं पण…
अंकिताला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण, ती ओघाओघाने या क्षेत्राकडे वळाली. अंकिता लोखंडेला अभिनेत्री बनण्याऐवजी एअर होस्टेस व्हायचे होते. त्यासाठी तिने फ्रँकफिन अकादमीत प्रवेशही घेतला होता. त्याच दरम्यान ती राहत असलेल्या इंदूरमध्ये झी- सिनेस्टारच्या एका मालिकेच्या कलाकारांसाठी ऑडिशन ठेवण्यात आल्या होत्या. त्यात तिने आपले नशीब आजमावले आणि तिची निवड झाली.
तेव्हापासून तिच्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तिने हळूहळू अभिनयाबद्दल विचार करायला सुरुवात केली. त्यानंतर २००४ मध्ये अंकिता मुंबईत आली आणि तिने मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतली. अंकिता लोखंडे ‘बाली उमर को सलाम’ या शोमधून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पण तिचा तो शो केव्हाच टेलिकास्ट झाला नाही.
‘पवित्र रिश्ता’द्वारे मिळाली संधी
त्यानंतर अंकिताला एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. त्या मालिकेत अभिनेत्रीने अर्चनाच्या भूमिकेतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक वर्षे टीव्हीवर काम केल्यानंतर अंकिताने ‘मणिकर्णिका’ या बॉलिवूड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात ती कंगना रणौतसोबत दिसली होती. कंगनाच्या या चित्रपटानंतर ती ‘बागी ३’मध्ये झळकली होती. त्यानंतर अभिनेत्रीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातही काम केलं आहे.
दरम्यान 2019 मध्ये विकीने अंकिताला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे डिसेंबर 2021 मध्ये विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List