नवऱ्याने साथ सोडली, बॉयफ्रेंडने वेश्या व्यवसायात ढकललं, अभिनेत्रीचा अंत होता अत्यंत वाईट
झगमगच्या विश्वातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसतो. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात यश तर मिळालं पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला. असाच अभिनेत्रींनी पैकी एक म्हणजे अभिनेत्री विमी. नवऱ्याने दोन मुलांच्या जन्मानंतर साथ सोडली. त्यानंतर बॉयफ्रेंडने देखील अभिनेत्रीची फसवणूक करत तिला वेश्या व्यवसायात ढकललं. अखेर व्यसनाच्या अहारी गेलेली अभिनेत्री एकटीच पडली. शेवटच्या क्षणी देखील तिच्यासोबत कोणीच नव्हतं.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री विमी (Vimi Life Story) यांनी फार कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली. पण अभिनेत्रीचं खासगी आणि वैवाहिक आयुष्याचं सुख मिळालं नाही. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापू्र्वी विमी यांनी उद्योजक शिव अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. विमी आणि शिव यांना दोन मुलं देखील होती. दोन मुलांची आई असूनही चाहत्यांमध्ये विमीची क्रेझ फार होती.
विमीने फार कमी वेळात यशाचं उच्च शिखर गाठलं. राज कुमार यांच्यापासून ते सुनील दत्त यांच्यासोबत अनेक अभिनेत्यांना विमी यांच्यासोबत काम करायचं होतं. पण नवऱ्याने साथ सोडल्यानंतर अभिनेत्रीचा वाईट काळ सुरु झाला. अभिनेत्रीला सिनेमांसाठी ऑफर येणं बंद झाल्या. विमी यांचे ‘आबरू’, ‘वचन’ आणि ‘पतंगा’ सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर त्यांच्या करियरला ब्रेक लागला.
यश मिळवल्यानंतर आणि लग्नाच्या अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक बदल झाले. अखेर अभिनेत्री पतीपासून विभक्त झाली. पतीची साथ सुटल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. पण दुसऱ्या प्रेमाने अभिनेत्री फक्त दुःख आणि वेदना दिल्या. अशात विमी जॉली नावाच्या एका ब्रोकरसोबत राहू लागल्या.
अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने तिवा वेश्या व्यवसायात ढकललं. अखेर व्यसानाच्या अहारी गेलेल्या विमी यांना अनेक आजारांनी ग्रासलं. पण अभिनेत्रीच्या कठीण काळात कोणीच त्यांच्यासोबत नव्हतं. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी नानावटी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये विमीने अखेरचा श्वास घेतल्याचं सांगण्यात येत. एकेकाळी महागड्या वाहनांतून मुंबईच्या रस्त्यावर फिरणाऱ्या विमीचा मृतदेह हातगाडीतून स्मशानभूमीत नेण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List