Mumbai Boat Capsized: बोटीमध्ये लाईफ जॅकेट्सच नव्हते, मावशी-बहीणीसोबत असतानाच टक्कर.. प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मुंबईत बुधावरी दुपारी गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात नेव्हीच्या बोटीची धडक बसून नीलकमल नावाच्या बोटीला भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास झालेल्या या अपघातात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नेव्हीच्या बोटीने नीलकमल बोटीला जोरदार धडक दिली. यामध्ये 115 जणांना सुखरूपपमए सोडवण्यात आले असून 2 जण अद्याप बेपत्ता असून 2 जखमींची हाल अजून गंभीर असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेमध्ये नेव्हीच्या स्पीड बोटवर असलेल्या तीन व्यक्तींचा देखईल मृत्यू झाला. घटनेची माहिची मिळताच एकच खळबळ माजली. मात्र नेव्ही आणि स्थानिक टीम्सनी धाव घेत प्रवाशांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
यामध्ये अनेक प्रवासी होतो, ज्यांनी हा थरारक प्रसंग याची देही याची डोळा पाहिला, त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील गौतम. हा थरारक प्रसंग नेमका कसा घडला हे त्याने स्वत: पाहिले आणि त्याची आपबिती कथन केली. गौतम त्याच्या मावशी आणि बहिणीसोबत एलिफंटा केव्ह्स बघायला जात होता, तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये त्याच्या मावशीचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
प्रवासी गौतमच्या सांगण्यानुसार, या ( नीलकमल) बोटमधील कोणाकडेच सेफ्टी जॅकेट नव्हतं, अपघातानंतर आम्ही अनेकांना पाण्यातून बाहेर काढून बोटच्या दिशेने खेचलं. दुर्घटनेनंतर 20 ते 25 मिनिटांनी नेव्हीने आमची सुटका केली. पण तोपर्यंत माझ्या मावशीचा मृत्यू झाला होता.
तर दुसरीकडे राजस्थानच्या जालौर मधील रहिवाली श्रवणकुमारने या दुर्घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. नेव्हीची बोट स्टंट करत होती, ते पाहूनच आम्हाला शंका वाटली म्हणून आम्ही व्हिडीओ शूट करण्यास सुरूवात केली. अवघ्या काही क्षणांतच ती ( नेव्हीची) बोट आमच्या बोटला येऊन धडकली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
तत्पूर्वी, दुसरा एक प्रत्यक्षदर्शी गणेश याने सांगितले की, नौदलाची स्पीड बोट अरबी समुद्रात चक्कर मारत होती, तर आमची बोट मुंबईजवळील एलिफंटा बेटाकडे जात होती. दुपारी 3.30 च्या सुमारास मी बोटीवर चढलो. नेव्हीची ही बोट आमच्या बोटीला धडकली तर… असा विचार माझ्या डोक्यात आलाच होता, आणि अवघ्या काही क्षणात डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच ही दुर्घटना घडली. मूळचा हैदराबादचा असलेला गणेश याची रेस्क्यू टीमने सुटका केली.
त्याच्या सांगण्यानुसार, या बोटीवर 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. दुपारी 3.30 ला मी तिकीट विकत घेतलं आणि बोटीच्या डेकवर गेलो. नीलकमल बोट मुंबईच्या किनाऱ्यापासून 8 ते 10 किमी अंतरावर होती. समोर नेव्हीची स्पीड बोट पूर्ण वेगाने फिरत होती. स्पीड बोट आमच्या बोटीला धडकताच समुद्राचे पाणी आमच्या जहाजात शिरू लागलं. ते पाहून कॅप्टनने सर्व प्रवाशआंना लाईफ जॅकेट्स घालण्यास सांगितल्याचं त्याने नमूद केलं.
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत
दरम्यान या दुर्दैवी अपघातात जीव गमवाव्या लागलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नौदलाचा स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार लोकांविरुद्ध कलम 106(1), 125(a)(b), 282, 324(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथे पोलिसांकडून शोध मोहीमेला पुन्हा सुरूवात
दरम्यान गेटवे ऑफ इंडिया येथे पोलिसांकडून शोध मोहीमेला पुन्हा सुरूवात झाली आहे. काल रात्री अंधार झाल्याने काही वेळ शोध मोहीम थांबवण्यात आली होती. मात्र आज पहाटे पासून पुन्हा पोलिसांची रेस्क्यू टीम समुद्रात उतरली आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी स्पीड बोट घेऊन तैनात झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List