रशियाने कॅन्सरवरची लस बनवली; 2025 पासून नागरिकांना फ्रीमध्ये मिळणार

रशियाने कॅन्सरवरची लस बनवली; 2025 पासून नागरिकांना फ्रीमध्ये मिळणार

कॅन्सरवरची लस बनवण्यात रशियाला मोठे यश आले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून 2025 पासून रशियातील नागरिकांना ही लस मोफत दिली जाणार आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक आंद्रेई कॅप्रिन यांनी रेडिओवरून ही माहिती देशवासीयांना दिली. रशियाने कर्करोगाविरुद्ध स्वतःची एमआरएनए लस विकसित केली आहे. रशियाचा हा शोध शतकातील सर्वात मोठा शोध मानला जात आहे. 2024 च्या सुरुवातीला या लसीसंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी माहिती देत म्हटले होते की, रशिया आता कॅन्सरवरील लस बनविण्याच्या अगदी जवळ आहे. पुतीन यांनी केलेला दावा अखेर 2024 च्या अखेरीस पूर्ण झाल्याचे दिसत आहे. कारण, डिसेंबरच्या अखेरपर्यंत रशियाने लस बनवल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

एमआरएनए लस म्हणजे काय?

एमआरएनए हा मानवी अनुवांशिक कोडचा एक छोटासा भाग आहे, जो शरीरातील पेशींमध्ये प्रथिने बनवतो. जेव्हा एखादा विषाणू शरीरावर हल्ला करतो तेव्हा एमआरएनए टेक्नोलॉजी पेशींना त्या विषाणूशी लढण्यासाठी प्रथिने तयार करण्याचे संदेश पाठवतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला आवश्यक प्रथिने मिळतात व शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत होते. ही पॅन्सरवरील लस एमआरएनएवर आधारित पहिली लस आहे.

हिंदुस्थानात कॅन्सरग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढतेय

हिंदुस्थानात कॅन्सर झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2022 मध्ये हिंदुस्थानात 14.13 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली. यात 7.22 लाख महिला तर 6.91 पुरुषांचा समावेश आहे. 2022 मध्ये 9.16 लाख रुग्णांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे. येत्या पाच वर्षांत कॅन्सर रुग्णांच्या संख्येत 12 टक्के वाढ होईल, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने अंदाज वर्तवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List