PM मोदींनी अमित शहांना बडतर्फ करावं, आंबेडकर वादावर मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावरूनच आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. खरगे यांनी पंतप्रधान मोदींना गृहमंत्री अमित शहा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना (अमित शहा) मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असंही खरगे म्हणाले आहेत. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, काल अमित शहा यांनी एक गोष्ट बोलली जी अत्यंत निषेधार्ह आहे. या लोकांचा संविधानावर विश्वास नाही, हे सांगायला मला भाग पडले आहे. जेव्हा आपण स्वर्ग आणि नरकाबद्दल बोलतो तेव्हा आपण मनुस्मृतिबद्दल बोलतो. त्यात फक्त स्वर्ग काय आणि नरक काय हेच लिहिले आहे. आंबेडकर ज्या विचारधारेवर विश्वास ठेवत नाहीत, त्या विचारधारेने स्वर्ग-नरकाबद्दल बोलले नाही, असे अमित शहा म्हणाले. त्यांचा बचाव करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सहा ट्विट केले. काय गरज होती? जर कोणी बाबासाहेबांबद्दल चुकीचे बोलले तर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, पण दोघेही खूप जवळचे मित्र आहेत आणि एकमेकांच्या पापात साथ देतात.”
खरगे पुढे म्हणाले की, अमित शहांना हे चुकीचे आहे, हे सांगण्याऐवजी पंतप्रधान मोदी त्यांचा बचाव करत आहेत. या लोकांचा संविधानावर विश्वास नाही. ते म्हणाले, “अमित शहांनी माफी मागावी, अशी आमची इच्छा आहे. जर पंतप्रधान मोदींना आंबेडकरांबद्दल थोडाही आदर असेल, तर अमित शहा यांना मध्यरात्री 12 पर्यंत मंत्रिमंडळातून काढून टाकावं. राज्यघटनेची शपथ घेऊन संसदेत पोहोचणाऱ्या आणि राज्यघटनेचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तातडीने बडतर्फ करण्यात यावे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List