प्राण्यांच्या देखभालीसाठी आता ‘पेट लिव्ह’
कामाच्या ठिकाणी सुट्टी मिळत नाही, अशी तक्रार अनेकदा केली जाते. अशातच काही कंपन्या मिलेनियल आणि जनरेशन झेडच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुट्ट्यांची ऑफर देताना दिसत आहेत. यामध्ये पेट लिव्ह म्हणजे पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी सुट्टी आदींचा समावेश आहे.
अनेक टेक कंपन्या नव्या पिढीच्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या सुट्ट्या देऊ लागल्या आहेत. यामध्ये अनलिमिटेड सिक लिव्ह, पेट लिव्ह, आजीआजोबांसोबत वेळ घालवण्यासाठी व संगीत ऐकण्यासाठी लिव्ह अशा सुट्ट्यांच्या समावेश आहे. कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवणे आणि त्यांनी कंपनीत टिकून राहावे, यासाठी असे फंडे आणले जात आहेत.
मिलेनियल आणि जनरेशन झेडच्या कर्मचाऱ्यांचे वर्क लाईफ संतुलन, मानसिक आरोग्य आणि व्यावसायिक वृद्धी आदी बाबींनी टेक कंपन्या प्राधान्य देताना दिसत आहेत. कंपनीमध्ये काम शिकून नव्या पिढीच्या कर्मचाऱ्यांनी अन्य कंपन्यांमध्ये जाऊ नये, हादेखील यामागील हेतू आहे. हैदराबाद येथील मल्टी नॅशनल कंपनी मेंटल हेल्थ सांभाळण्यासाठी एक दिवसाची अतिरिक्त सुट्टी देते.
कंपनी त्याच्या जिम मेंबरशीपची फीदेखील भरते. तसेच वेलनेस इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी वर्षाला 25 हजार रुपये देते. आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याची कंपनी लाईव्ह म्युझिक डे, ग्रॅण्डपॅरेंट्स डे या सुट्ट्या देत असल्याचे सांगितले. मिलेनियल म्हणजे ज्यांचा जन्म 1981 ते 1996 दरम्यान झाला अशी पिढी तर जनरेशन झेड म्हणजे ज्यांचा जन्म 1997 ते 2012 मध्ये झाला, अशी पिढी होय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List