अवघ्या एका दिवसात 1.62 कोटी आयटीआर
इन्कम टॅक्स विभागाने एक नवीन रेकॉर्ड केला. आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयकर विभागाने अवघ्या एका दिवसात 1.62 कोटीहून अधिक आयटीआर फाईल प्रोसेस केल्या. हा एक नवीन रेकॉर्ड आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली. एका आठवड्यात आयकर विभागाने 26.35 टक्के रिटर्न प्रोसेस केली, तर 2023-24 मध्ये हा आकडा 22.56 टक्के होता. 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करू शकता. यासाठी 5 हजार रुपयांपर्यंतची फी द्यावी लागू शकते. रिटर्न फाईल करण्याची अखेरची तारीख 31 जुलै होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List