कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर 1 टक्का करावा, आदित्य ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे मागणी
मुंबईसह राज्यात कलेक्टर लॅन्ड अनेक गृहनिर्माण संस्थांना भाडेकरारावर राहण्यासाठी देण्यात आला आहे. ही जमीन फ्री होल्ड करण्यासाठी 15 टक्के दर आकारण्यात येतो. हा दर कमी करून 1 टक्का करावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे फ्री होल्ड करण्याचे प्रमाण वाढेल आणि सरकाही तिजोरीत भर पडेल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर १% करावा, ही विनंती केली होती. त्यावर आज पुन्हा एकदा विधिमंडळात विनंती केली.
यामुळे लवकरच मुंबईकरांना न्याय आणि संधीचा लाभ घेता येईल, ही आशा बाळगतो. pic.twitter.com/tMoEgyBdej— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 17, 2024
मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई शहर व महाराष्ट्रातील कलेक्टर लॅन्ड विविध कारणांसाठी गृहनिर्माण संस्थांना भाडेकरारावर रहिवासी वापरासाठी दिलेल्या आहेत. सदर कलेक्टर लॅन्ड फ्री होल्ड करण्यासाठी १५% इतका दर आकारण्यात येतो. हा दर 1 टक्का करण्यात यावा, जेणेकरून अशा जमिनीवर असणाऱ्या गृहनिर्माण संस्थामधील सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल तसेच गृहनिर्माण संस्थांच्या जागा फ्री होल्ड करून घेण्याचे प्रमाण वाढून सरकारी तिजोरीमध्ये हि भर पडेल. तरी महाराष्ट्रातील कलेक्टर लॅन्ड फ्री होल्ड करण्याचा दर 1 टक्का करावा अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List