तुम्हाला भ्रष्टाचाराची काळजी वाटते तेव्हा भ्रष्टाचार वाढतो, संजय राऊत यांचे तडाखेबंद भाषण; भाजपला टोलवलं
जर भाजपचा चारसौ पार चा नारा खरा ठरला असता तर यांनी संविधान बदलण्यासाठी यांनी मागे पुढे पाहिलं नसतं असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केली. तसेच भाजपला जेव्हा भ्रष्टाचाराची काळजी वाटते तेव्हा भ्रष्टाचार वाढतो, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
राज्यसभेत संविधानावरील चर्चेवर संजय राऊत म्हणाले की, संविधानाची गौरवशाली वाटचाल 2014 पासून बंद झाली.जर भाजपचा चारसौ पार चा नारा खरा ठरला असता तर यांनी संविधान बदलण्यासाठी यांनी मागे पुढे पाहिलं नसतं. तर आजचा विषय असता की संविधान बदलणं का गरजेचं आहे. आम्ही भारतीय लोक या वाक्याने संविधानाची सुरूवात होते. पण गेल्या 10 वर्षांत भारत गायब झाला आहे. आणि आम्ही मोदी के लोक सुरु झालं असे संजय राऊत म्हणाले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्तची घोषणा केली होती. भ्रष्टाचारावर शुन्य सहिष्णूता. जेव्हा तुम्हाला भ्रष्टाचाराची काळजी वाटते तेव्हा भ्रष्टाचार वाढतो. पंतप्रधान मोदी फार गोड बोलतात, पण गोड बोलल्याने आतले भेद दिसत नाहीत. मोर किती सुंदर नाचतो, किती सुंदर दिसतो, पण मोराला पाहून कुणी म्हणेल का की मोर सापसुद्धा खातो. आपले संविधान आपल्या देशातल्या विविधा जाती धर्माच्या 140 कोटी लोकांना एकत्र आणतो. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही एक आहोत असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List