जिंदाल कंपनीत प्रदूषण करणाऱ्या कामकाजावर बंदी आणा, शिवसैनिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिंदाल कंपनीत प्रदूषण करणाऱ्या कामकाजावर बंदी आणा, शिवसैनिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिंदाल पोर्ट कंपनीच्या वायूगळतीचे प्रकरण पेटलेले असताना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या वायूगळती प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी आणि मानवी जिवीताला धोकादायक असलेल्या कंपनीतील सर्व प्रकारांना बंदी घालावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

जिंदाल पोर्ट कंपनीमध्ये 12 डिसेंबर रोजी एलपीजी वायूगळती झाली. या वायूगळतीमुळे शेजारी असलेल्या माध्यमिक विद्यामंदिरमधील 68 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. जिंदाल कंपनीच्या प्रदुषणाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात मोठी दुर्घटनाही या परिसरात घडू शकते अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात वायूगळती प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिंदाल कंपनीमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पातील मानवी जिवीताला धोकादायक असलेल्या सर्व प्रकारच्या कामकाजांवर बंदी आणावी अशी मागणी शिवसैनिकांनी रेटून धरली.

वायूगळतीमुळे परिसरातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या जिवीताला धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वायूगळतीच्या घटनेचे गांभीर्य पाहता यापुढे तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा भोपाळ वायूगळतीसारखी दुर्घटना घडेल अशी भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, विभागप्रमुख अमित खडसोडे, साजीद पावसकर, संदीप सुर्वे, माजी नगरसेविका रशीदा गोदड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

रस्ते अपघाताला जिंदाल कंपनी जबाबदार

जयगडपासून आजूबाजूच्या परिसरात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावरही शिवसैनिकांनी बोट ठेवले. या गंभीर अपघाताला जिंदाल कंपनीतून चालणारी ओव्हरलोड वाहतूक कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. या ओव्हरलोड वाहतुकीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणीही करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल
पंतप्रधान दिल्लीच्या जनतेला दररोज शिवीगाळ करत आहेत, दिल्लीच्या जनतेचा अपमान करत आहेत, दिल्लीची जनता भाजपला या अपमानाचे उत्तर निवडणुकीत देईल,...
Eknath Shinde Threat: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
मुंबईकरांना मिळणार सर्वत्र मेट्रो प्रवासाचा आनंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड गाणं; महेश बाबूच्या बायकोचा बाथरूममधील ‘तो’ सीन पाहाताच वाटते लाज, लोक बदलतात चॅनल
स्वतंत्र हिंदुस्थानात RBI ने सर्वातआधी जारी केली होती ‘ही’ नोट, जाणून घ्या नोटेवर कोणाचा छापण्यात आला होता फोटो
Affordable Maruti Brezza – मारुती ब्रेझाची किंमत होऊ शकते कमी, लहान इंजिनसह येईल नवीन मॉडेल
टीव्ही मालिका पाहून तांत्रिकाने दोघांचा काटा काढला, पण तिसऱ्याला संपवण्याच्या तयारीत असतानाच पर्दाफाश