परभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसचा सभात्याग, आजच्या पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार
परभणी इथे संविधानाची विटंबना करण्यात आली. यानंतर झालेल्या आंदोलनात कार्यकर्ता सोमनाथ0 सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. बीड इथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या दोन्ही प्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. पण अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विधानसभेच्या आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
परभणीत सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेडकरी चळवळीतील मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या लाठीमारामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे, असे पोस्टमार्टम रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठा असंतोष आहे. यामुळे स्थगन प्रस्तावावर चर्चा करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली. नियम 101 अन्वये बुधवारी आपण सभागृहात चर्चा घेऊ, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. यामुळे काँग्रेसने सभात्याग केला.
आपल्याला नाही बोलू द्यायचं, अध्यक्ष महाराज हा आपला अधिकार आहे. पण परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करतोय. सरकार या प्रकरणी गंभीर नाही म्हणून आम्ही बहिष्कार टाकतो, असे नाना पटोले सभागृहात म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List