अर्थव्यवस्था संकटात! व्यापारी तुटीने गाठला उच्चांक; सोने, चांदी आणि खाद्यतेल आयातीने वाढवलं टेन्शन
हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत. देशाची निर्यात मंदावली आहे. तर आयातीने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. यामुळे हिंदुस्थानच्या व्यापारी तुटीने चरम सीमा गाठली आहे. सोने आयातीने गेल्या वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे. हिंदुस्थानच्या व्यापारी तुटीने आतापर्यंत उच्चांक गाठला असून गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. नोव्हेंबरमध्ये देशाची व्यापारी तूट ही 37.84 अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. तर सोने आयातीने नवा रेकॉर्ड केला असून नोव्हेंबरमध्ये 14.8 डॉलरपर्यंत सोने आयात झाली आहे.
व्यापारी तूट का वाढली?
व्यापारी तूट अर्थात निर्यातीपेक्षा आयात अधिक झाल्याने एवढी भीषण स्थिती बनण्याचे मुख्य कारण म्हणजे सोने आयातीत झालेली वाढ आहे. कारण 37.84 अब्ज डॉलरच्या आयातीत एकट्या सोने आयातीचा वाटा हा 14.8 अब्ज डॉलर इतका आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तुलनेत हिंदुस्थानची निर्यात 4.85 टक्क्यांनी घसरून 32.11 अब्ज डॉलरवर आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत हिंदुस्थानची आयात 27 टक्क्यांनी वाढून 69.95 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. खाद्यतेल, चांदी आणि इतर वस्तुंच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने आयात वाढत आहे.
व्यापारी तूट वाढत असल्याने विदेशी चलनसाठा रिकामा होईल. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव तळाला जाईल. रोजगारापासून ते व्यापारापर्यंत सर्वांना याचा फटका बसू शकतो. तसेच महागाई आणखी वाढेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List