डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान सहन करणार नाही; शहांच्या वक्तव्याविरोधात मुंबईसह राज्यभर आंदोलने
गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळला असताना केंद्र सरकारकडून शहांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आजही मुंबईसह राज्यभरात जोरदार आंदोलने करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करीत शहांविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमा-पुतळेही जाळण्यात आले. महाविकास आघाडीकडूनही शहांच्या वक्तव्याचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले.
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात भर संसदेत अवमानजनक वक्तव्य केले. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांसह संपूर्ण जनमाणसांत शहांविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहांवर कोणतीही कारवाई केली नसल्याने जनतेच्या संतापाचा उद्रेक होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत पर्ह्टमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ शहांच्या वक्तव्याचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. शिवाय मालाड, घाटकोपर, दादरमध्येही आंदोलने झाली. काँग्रेसकडून मंत्रालयाजवळ आंदोलन करीत शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List