कुर्ला अपघातातील मृतांचा आकडा वाढला, आज परिस्थिती काय?

कुर्ला अपघातातील मृतांचा आकडा वाढला, आज परिस्थिती काय?

Kurla Bus Accident : मुंबईतील कुर्ला परिसरात झालेल्या बेस्ट अपघातामुळे मुंबईकर हादरले आहेत. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात काहींचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. सध्या या अपघातातील मृतांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. कुर्ल्यातील बस अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्ब्ल 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल 60 प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

कुर्ला परिसरात रात्री मृत्यूतांडव पाहायला मिळाले. सोमवारी रात्री 9.50 च्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर एक बस सुसाट वेगाने आली. यानंतर भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली. त्यानंतर तिने अनेकांना धडक दिली. ही बेस्टची बस 332 नंबरची होती आणि ती कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती. ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना हा अपघात घडला. ही बस कुर्ल्यात आल्यानंतर बेस्ट बसचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला, अशी माहिती समोर येत आहे.

कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण?

कुर्ला बस अपघातानंतर आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कुर्ला अपघातातील एकूण ३६ जखमींवर सायन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना सायन रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या अपघातातील ६ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आफ्रीन अब्दुल सलीम शहा (१९), अनम शेख (२०), फातिमा गुलाम कादरी (५५), शिवम कश्यप (१८) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत. तसेच कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात ३५ जणांवर उपचार सुरु आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांचे मृतदेह या ठिकाणी आणण्यात आले आहेत.

यासोबतच कोहिनूर रुग्णालयात ३ जखमींना दाखल करण्यात आले होते. यातील एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. यासोबतच या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवानही जखमी झाले आहे. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या या पोलिसांची प्रकृती स्थिर आहे. यासोबतच कुर्ल्यातून सिटी रुग्णालयात एकावर उपचार सुरु आहेत. तसेच हबीब रुग्णालयात सहा जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत कुर्ल्यात झालेल्या बस अपघातात 49 पैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

बस स्टॉप तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद

दरम्यान बुद्ध कॉलनी येथे काल रात्री अपघात झाल्याने पोलिसांनी कुर्ला स्टेशनजवळील बस स्टॉप तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद केला आहे. यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. त्यामुळे 37,320,319,325,330,365 आणि 446 बसेस कुर्ला आगारातून चालतील. तर काही तसेच सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन चालणारे बसमार्ग 311, 313 आणि 318 च्या बसेस टिळक नगर यू वळण घेऊन कुर्ला स्टेशन न जाता सांताक्रुझ स्टेशनला जातील. फक्त बसमार्ग 310 च्या बसेस टिळक नगर पुल येथे यू टर्न मारुन बांद्रा बस स्थानक जातील. यामुळे प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?