जयंत पाटील राष्ट्रवादीत येणार? आता अजितदादा गटाच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य, म्हणाले, गुड न्यूज मिळेल…

जयंत पाटील राष्ट्रवादीत येणार? आता अजितदादा गटाच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य, म्हणाले, गुड न्यूज मिळेल…

नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनादरम्यान आज विधानसभेत चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली. चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं, या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा अध्यक्षांचा मान किती मोठा असतो याबाबत ते बोलत असताना ते म्हणाले की मी 90 साली पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असं जयंत पाटील म्हणताच अजित पवार म्हणाले की तुम्ही अध्यक्ष नाही आमदार झालात, तेव्हा जयंत पाटील यांनी सारवासारव करत म्हटलं की बघा अजितदादांचंं माझ्यावर किती लक्ष आहे, तेव्हा अजित पवार लगेच म्हणाले की माझ तुमच्यावर लक्ष आहे पण तुम्ही कधी प्रतिसाद देताय, तेव्हा जयंत पाटील म्हणााले की दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय, दरम्यान जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले मिटकरी? 

जयंत पाटलांचे भाषणातील एक महत्त्वाचं वाक्य मला खूप भावलं, दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार, म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय ते घेणार आहेत. महाराष्ट्राला गुड न्यूज मिळेल असं मला वाटतं,  सगळं काही उघड करता येत नाही. मागच्या वेळी त्यांनी प्रयत्न केले होते, पण ती योग्य वेळ नव्हती. त्यांना आवाहन करायला मी मोठा नाही. त्यांच्यासाठी देवगिरीची दार अखंड खुली आहेत. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, तो आम्हालाच काय भाजपाला पण हवाहवासा वाटतो. ड्राईव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव ते उत्तम चालक आहेत, वेळ पडली तर स्टेरिंग त्यांच्या हाती देऊ. रथ कोणी हाकलावा हा नंतरचा भाग. हे विधान महाराष्ट्राला खूप काही सांगून जाणारं आहे, असं सूचक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे.  

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विलेपार्लेत परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी तरुणाला तुडवले विलेपार्लेत परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी तरुणाला तुडवले
‘रिक्षा देखकर चलाओ’ असे म्हटल्याचा राग आल्याने तिघा परप्रांतीय रिक्षाचालकांनी मराठी तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले येथे...
तामीळनाडूत सात फूट उंचीचा केक
लक्षवेधक – कैलास यात्रेसाठी आता फक्त 16 दिवस लागणार
चीनचे प्रसिद्ध ऍप टिकटॉकवर आता अल्बानियातही बंदी; हे ऍप छोटी मुले आणि समाजासाठी धोकादायक
मुलगी पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांचा प्रवास
जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, पारा घसरला; शाळा, महाविद्यालयांना हिवाळी सुट्ट्या जाहीर
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड, घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांचे आंदोलन