दोघे लग्न का नाही करत? सलमान खानला ‘त्या’ महिलेच्या कुटुंबियांसोबत पाहताच चर्चांचा उधाण

दोघे लग्न का नाही करत?  सलमान खानला ‘त्या’ महिलेच्या कुटुंबियांसोबत पाहताच चर्चांचा उधाण

Salman Khan Love Life: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या सलमान खान याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सलमान एक महिला आणि तिच्या कुटुंबियांसोबत आनंदी दिसत आहे. सलमान खान याच्यासोबत ज्या महिलेचे आणि तिच्या कुटुंबियांचे फोटो व्हायरल होत आहेत, ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून लुलिया वंतूर (Iulia Vantur) आहे. खुद्द लुलिया हिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान आणि लुलिया वंतूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता देखील असं काही झालं ज्यामुळे सलमान – लुलिया यांच्या लग्नाची चर्चा रंगू लागली. लुलिया हिच्या वडिलांच्या वाढदिवशी सलमान खान देखील त्यांच्यासोबत होता.

वडील आणि सलमान यांच्यासोबत फोटो पोस्ट करत लुलिया कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘हॅप्पी बर्थडे डॅड…. आय लव्ह यू आणि माझ्या दोन हिरोंना धन्यवाद…’ शिवाय लुलिया हिने पुढे हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त लुलिया हिने शेअर केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Iulia V Vantur (@vanturiulia)

 

सलमान खान याला लुलिया हिच्या कुटुंबियांसोबत पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान नात्याची अधिकृत घोषणा का करत नाही…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही दोघे लग्न का करत नाही…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सोबत किती चांगले दिसत आहेत…’

सलमान खान – लुलिया वंतूर

सलमान खान आजही एकटं आयुष्य जगत आहे. पण सध्या लुलिया वंतूर हिच्यासोबत सलमान खान याच्या नावाची तुफान चर्चा रंगलेली असते. तिचं नाव कायम सलमान याच्यासोबच जोडण्यात आलं. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

रिपोर्टनुसार, लुलिया भारतात आल्यावर सलमान खान याच्यासोत तिच्या भेटी वाढल्या. दरम्यान दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील जोर धरु लागल्या. अफेअरच्या चर्चा रंगत असताना लुलिया हिला सलमान खान याच्यासोबत लग्न करणार का? असा प्रश्न देखील अनेकदा विचारण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?