नव्या बॉयफ्रेंडसह कॉन्सर्टमध्ये पोहोचली मलायका अरोरा? दोघांचा ‘तो’ फोटो चर्चेत
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर मलायकाचं नाव एका ‘मिस्ट्री मॅन’शी जोडलं गेलं. या दोघांना हातात हात घालून रेस्टॉरंटमधून बाहेर येताना पाहिलं गेलं होतं. त्यानंतर मलायकाने नुकतीच गायक ए. पी. ढिल्लनच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. या कॉन्सर्टमध्ये पुन्हा एकदा मलायकाला त्याच मिस्ट्री मॅनसोबत पाहिलं गेलंय. त्याचं नाव राहुल विजय असल्याचं कळतंय. या कॉन्सर्टमध्ये मलायकाला स्टेजवरही आमंत्रित करण्यात आलं होतं. ए. पी. ढिल्लनने तिच्यासाठी खास गाणं म्हटलं आणि ती ‘बालपणीची क्रश’ असल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं. त्यानंतर दोघांनी स्टेजवर एकमेकांना मिठीसुद्धा मारली. यानंतर मलायकाने कथित बॉयफ्रेंड राहुल विजयसोबतचा सेल्फी शेअर केला. या दोघांच्या फोटोची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा होत आहे.
मलायकाने ए. पी. ढिल्लनचंच ‘विथ यू’ हे गाणं शेअर करत राहुलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. राहुलनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तो फोटो शेअर केला आहे. राहुलने मलायकाचा कॉन्सर्टमधील आणखी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती चाहत्यांसमोर फोटोसाठी पोझ देताना दिसून येत आहे. त्यावर त्याने लिहिलं, ‘थांबा.. हे मलायकाचं कॉन्सर्ट होतं का?’ अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान सिंगल असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही गमतीशीर पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यातलीच एक पोस्ट तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल होती. त्यात ‘रिलेशनशिपमध्ये, सिंगल आणि हेहेहेहे’ असे तीन पर्याय होते आणि त्यातील तिसऱ्या म्हणजेच ‘हेहेहेहे’ पर्यायावर बरोबरची खूण केली होती.
अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर 2018 पासून मलायका अर्जुनला डेट करू लागली होती. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं होतं. वयातील अंतरावरून दोघांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र या ट्रोलिंगलाही न जुमानता त्यांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला होता. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानही अर्जुनने मलायकाच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीत तिची साथ दिली होती. सप्टेंबर महिन्यात मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी मलायकाचं सांत्वन करण्यासाठी अर्जुन पोहोचला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List