तोतया सीबीआय अधिकाऱ्याने डॉलर लांबवले
तोतया सीबीआय अधिकाऱ्याने ऑफिस बॉयकडील सहा हजार डॉलर घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे ऑफिस बॉय असून ते एका खासगी कार्यालयात काम करतात. गेल्या आठवडय़ात त्यांना त्याच्या मालकाचा फोन आला. वर्सोवा येथे एकाला 6000 डॉलरची गरज असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ठरल्यानुसार ऑफिस बॉय हे डॉलर घेऊन तेथे गेले. तेथे एक जण आला. त्याने त्याची ओळख सांगितली. ओळख सांगितल्यावर त्यांना एकाने वर्सोवा येथील जे. पी. रोड येथे नेले. त्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना डॉलर आणले का अशी विचारणा केली.
त्यानंतर त्याने ते डॉलर संजय नावाच्या एका व्यक्तीकडे दिले. पैसे गाडीत ठेवले आहेत, असे सांगून त्यांना बाहेर नेले. त्याच दरम्यान दोन जण तेथे आले. त्याने ते सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर संजय आणि एकाला रिक्षात बसवले. तेव्हा तक्रारदार याने डॉलरची मागणी केली. मात्र ते काहीच न बोलता निघून गेले. घडल्या प्रकाराची माहिती त्याने त्याच्या मालकांना दिली. त्याच्या मालकाने त्याला थांबण्यास सांगितले. एक जण चेक देणार असून त्यामुळे पोलीस तक्रार करायची नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना एका नावाने चेक आला. त्या चेकबाबत माहिती घेतली. त्या खात्यात पैसे नसल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List