पेट परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण 5040 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यापैकी एकूण 3794 एवढे विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते. यापैकी या परीक्षेत एकूण 2008 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण 53 टक्के आहे.
परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल लॉगिनमध्ये या परीक्षेचे प्रमाणपत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. विद्यार्थ्याना मिळणारे प्रमाणपत्र हे विशेष फीचर क्यूआर कोडयुक्त असून ऑनलाइन पडताळणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. दिनांक 17 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी विविध केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
असा लागला निकाल
विद्या शाखानिहाय या परीक्षेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखेसाठी सर्वाधिक 921, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी 446 , मानव्यविद्या शाखेसाठी 275 आणि आंतरविद्या शाखेसाठी 366 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List