मालेगावच्या 100 कोटींच्या मनीलॉण्डरिंगचा सूत्रधार मेहमूद भगड फरार
मालेगावमधील 100 कोटींच्या मनीलॉण्डरिंगचा मुख्य सूत्रधार मेहमूद भगड ऊर्फ चॅलेंजर किंग हा सक्तकसुली संचालनालयाच्या (ईडी) डोळ्यात धूळ फेकून देशाबाहेर फरार झाला आहे. ईडीने त्याच्याकिरोधात कारकाईसाठी प्रक्रिया सुरू केली होती. त्याची कुणकुण लागताच भगड फरार झाल्याचे सांगण्यात येते. कारकाई होणार याची टीप त्याला गुजरातमधून मिळाल्याचीही चर्चा आहे. भगड पळून गेल्याने ईडीने आता त्याच्याकिरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
मालेगाव मनीलॉण्डरिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदला ईडीने अटक केली होती. सिराज मोहम्मदकर 14 बनाकट बँक खाती उघडण्याचा आणि देशभरात 21 अतिरिक्त खात्यांद्वारे आर्थिक हेराफेरीचा आरोप आहे. त्याच्या चौकशीमध्ये या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मेहमूद भगड असल्याचे उघड झाले होते. भगड हा मूळचा गुजरातचा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List