पुष्पा म्हणजे ब्रँड, ट्रेलर लाँचवेळी श्रीवल्लीचं वक्तव्य चर्चेत..
‘पुष्पा 2: द रुल’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या चित्रपटाची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. पुष्पा हा अवघा अडीच अक्षरांचा शब्द आहे पण त्याचा आवाज फार मोठा आहे. त्याच्या ट्रेलर वरूनच हे स्पष्ट झालंय. हा चित्रपट मोठा धमाका करणार असल्याचं नुकतचं दिसून आलंय, सर्वांनाच हा चित्रपट हलवणार आहे. फिल्मचा ट्रेलर लाँच होताच या चित्रपटाची नायिका रश्मिकाने केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पुष्पा 2 चा ट्रेलर लाँच होताच चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढली असून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट यंदाचा सर्वात मोठा आणि जबरदस्त ठरणार असल्याचं ट्रेलरवरूच सिद्ध होतंय. या चित्रटाद्वारे अल्लू अर्जुनचा सॉलिड अभिनया पुन्हा प्रेक्षकांना पाहता येणार आहे, तर श्रीवल्लीच्या भूमिकेता रश्मिका मंदाना पुन्हा एकदा नॅशनल क्रश बनणार यात तर काही शंकाच नाही.
या चित्रपटाच्या पहिल्या भागामुळे आधीच नॅशनल क्रेझ ठरलेली रश्मिका या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही धमाका करण्यास तयार आहे. ट्रेलर लाँचवेळी रश्मिकाने उपस्थितांशी संवाद साधला. पुष्पा 2 तुमच्या अपेक्षेपेक्षाजास्त सरस ठरेल, असा विश्वास रश्मिकाने यावेळी व्यक्त केला. तुम्ही सगळेजण मित्रांसहं-कुटुंबियांसह हा चित्रपट पहाला नक्की याल, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ पुष्पा 2 ची वाट पाहणाऱ्या सर्व चाहत्याचे रश्मिकाने आभार मानले.
सुकुमारने दिग्दर्शित केलेल्या पुष्पा 2 च्या ट्रेलरमध्ये पुष्पा राजचे जग उत्तम प्रकारे दाखवलंय. या मस्त ट्रेलरमधील पुष्पा राजचा स्वॅग सर्वांनाच आवडला. पुष्पाची एन्ट्री आणि डीएसपीचे धमाकेदार पार्श्वसंगीत सर्वांच्या हृदयाला भिडले. अल्लू अर्जुन आणि रश्मिका व्यतिरिक्त या चित्रपटात फहद फासिल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात फहद पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. Mythri Movie Makers आणि Sukumar Writings या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List