1 नोव्हेंबरच दिवाळीचा सर्वोत्तम मुहूर्त, राम मंदिराचा मुहूर्त देणाऱया गणेश्वर शास्त्री यांनी केले स्पष्ट
दिवाळीचा मुहूर्त 31 ऑक्टोबरचा की 1 नोव्हेंबरचा याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र, श्रीराम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिराचा मुहूर्त देणाऱया पंडित गणेश्वर शास्त्राr द्राविड यांनी 1 नोव्हेंबर हाच दिवाळी साजरी करण्यासाठीचा सर्वोत्तम मुहूर्त असल्याचे स्पष्ट केले आहे. देशभरातून याप्रकरणी तब्बल 250 हून अधिक प्रश्न आल्यानंतर पंडित गणेश्वर शास्त्राr द्राविड यांनी दोन दिवस शास्त्र आणि पंचांगांचा अभ्यास केला आणि त्यानंतर 1 नोव्हेंबर हाच दिवाळीसाठी सर्वोत्तम मुहूर्त असल्याचा निष्कर्ष काढला.
1 नोव्हेंबर रोजी उदय तिथीमध्ये प्रदोष आणि सूर्यास्तानंतर अमावस्याही आहे. त्यासोबतच स्वाती नक्षत्र आणि प्रतिपदादेखील आहे. ही बाब महालक्ष्मी पूजनासाठी उत्तम आहे, असेही पंडित गणेश्वर शास्त्राRनी म्हटले आहे. पाच प्रमुख पंचांगांमधील तीन पंचांगांनी 1 नोव्हेंबरलाच दिवाळी साजरी करण्याचा सर्वोत्तम मुहूर्त असल्याचे म्हटले आहे.
कधी करावे लक्ष्मीपूजन
सूर्यास्त होताच प्रदोषकाळ असतानाच लक्ष्मीपूजन करायला हवे, असे धर्मग्रंथ सांगतात. सूर्यास्तानंतर 24 मिनीटे प्रदोषकाळ राहातो. त्यानुसार शहरे आणि गावांमध्ये सूर्यास्ताची वेळ पाहून त्यानंतर 24 मिनीटांच्या कालावधीत प्रदोषकाळ असताना लक्ष्मीपूजन करावे असे सांगण्यात आले आहे.
या ग्रंथांचा केला अभ्यास
कृत्यसारसमुच्चय, जयसिंहकल्पद्रुम, शब्दकल्पद्रुम, प्रतिवार्षिक पूजा कथा संग्रह, पर्वनिर्णय, वर्षकृत्यदीपक आणि वर्षकृत्य ग्रंथ तसेच देशातील सर्वात प्राचीन पंचांगाचा अभ्यास पंडित गणेश्वर शास्त्राr द्राविड यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List