नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस; अजित पवार गटाने ऐकलं नाही, फडणवीसांनीच केलं उघड!
विधानसभा निवडणुकी जागावाटपावरून महायुतीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्सीखेस सुरू होती. बैठकांवर बैठका सुरू होत्या. आता उमेदवारीवरूनही महायुतीत धुसफूस असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठा वाद झाल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. नबाव मलिक यांना उमेदवारी देऊ नका हे आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले?
नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका, भाजप त्यांना साथ देणार नाही. हे आम्ही अजित पवार गटाला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. तरीही नवाब मलिक यांना फॉर्म बी देण्यात आला. भाजप त्यांचं काम करणार नाही. तिथे शिंदे गटाचा एक उमेदवार आहे. तो उमेदवार राहील तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List