आचारसंहितेत मार्केटयार्डात अनधिकृत बांधकामे जोरात; सभापती सचिवांना थांगपत्ताच नाही
पुणे बाजार समितीत गूळ भुसार बाजारात ऐन आचारसंहितेत अनधिकृत बांधकामांचे मजलेच्या मजले वाढू लागले आहेत. एकीकडे दहा संचालकांचा गट अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातले जाणार नसल्याचे सांगते. मात्र, सभापती गटाकडून कारवाई केली जात नसल्याने संचालक मंडळाचा मनमानी कारभार चर्चेत आला आहे. याकडे पणन संचालक, जिल्हा उपननिबंधक यांचे दुर्लक्ष होत आहे.
मार्केट यार्डातील गूळ भुसार बाजारात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संचालक मंडळाच्या काळातच हे प्रमाण वाढू लागले आहे. बाजारातील भूखंड क्रमांक 400 भबुतमल अँड सन्स येथे एक अनधिकृत मजला बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोलर पॅनलच्या नावाखाली संपूर्ण मजला वाढवण्याचा नवीन उद्योग बाजारात चांगलेच वाढले आहेत. यापूर्वी सोलरसाठी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव केला जात होता. आता ठराव न करताच मनमानी पद्धतीने कामे केली जात आहेत. अशा बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, बाजार समितीत असे अनधिकृत बांधकामे वाढत असताना पणन संचालक अथवा जिल्हा निबंधक यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
सभापतींनी 495 भूखंडावर कारवाई थांबवली!
बाजारातील भूखंड क्रमांक 495 धनावत ट्रेडर्स येथील वाढविलेल्या मजल्यावर कारवाई करण्याच्या सूचना दहा संचालकांच्या गटाने दिल्या होत्या. मात्र, व्यापाऱ्याने स्वतःहून केवळ पत्रे काढले त्यांनतर सह्यांचे अधिकार पुन्हा सभापती यांच्याकडे आल्यावर त्यांनी ही कारवाई थांबवली का? का कारवाई थांबवली गेली असे उलट सुलट चर्चा बाजारात सुरू आहेत.
एका व्यापाऱ्याचे बांधकामासाठी आदेश!
या नवीन बांधकामासाठी बांधकाम करणाऱ्या व्यापाऱ्याने कोणतीही परवानगी घेतली नाही. ना तसे पत्र बाजार समितीला देन्यात आले. तर सभापती अथवा सचिव यांनी देखील कोणतीही कामासाठी परवानगी किंवा सूचना दिल्या नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, एका व्यापाऱ्याने सांगितले म्हणून हे काम सुरू होते असे पाहणीत निदर्शनास आल्याने आता त्या संबंधीत व्यापाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणे जरुरीचे आहे.
बाजारातील अनधिकृत बांधकाम पडून टाकण्याबाबत वेळोवेळी नोटीस देण्यात आल्या आहेत. सोलर पॅनलच्या नावाखाली कोणी उंची वाढवून अनधिकृत शेड अथवा मजला बांधत असल्याचे आढळून आल्यास ते पाडण्याची कारवाई केली जाईल.
– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List