ठसा- मंगेश कुलकर्णी 

ठसा- मंगेश कुलकर्णी 

>> दिलीप ठाकूर

एखाद्या चित्रपटात अनेक नामवंत कलाकार एकत्र काम करीत असताना विशेष कुतूहल असते ते या सगळ्यांच्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय व दृश्य वा जागा ( फुटेज या अर्थाने) देणारी कथा काय असेल आणि पटकथा कोणी लिहिली आहे? अमोल प्रॉडक्शन्स निर्मित व श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘लपंडाव’ ( 1993) या चित्रपटात विक्रम गोखले, अशोक सराफ, वंदना गुप्ते, सविता प्रभुणे, अजिंक्य देव, वर्षा उसगावकर, बाळ कर्वे, सुनील बर्वे, आनंद इंगळे अशी कलाकारांची खूपच मोठी जंत्री असल्याने तर गोष्ट कोणाची आहे, हा महत्त्वाचा प्रश्न होताच. या चित्रपटाची कथा, पटकथा-संवाद मंगेश कुलकर्णीचे आहेत हे समजताच या चित्रपटात नक्कीच दर्जेदार कथा पाहायला मिळणार याची खात्री पटली. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला यात बरेच काही आले.

मंगेश कुलकर्णी ‘लपंडाव’मुळे नावारूपास आले. कथा, पटकथा-संवाद व गीत लेखन याबरोबरच लहानमोठ्या भूमिकांतही ते रमले. रंगभूमी, चित्रपट व  मालिका या तीनही माध्यमांतून त्यांनी भरपूर लक्षवेधक कामगिरी केली. त्यांची ओळख मात्र ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘मंथन’, ‘मनमानसी’ अशा छोठ्या पडद्यावरील मालिकांच्या शीर्षक गीतांचा लेखक म्हणून चर्चेत राहिले. शशांक सोळंकी निर्मित व विनय आपटे दिग्दर्शित  ‘आभाळमाया’च्या शीर्षक गीत लेखनात त्यांची प्रतिभा दिसते. खरं तर या गीतासंदर्भात भेटण्यासाठी मंगेश कुलकर्णीने बेस्ट बसने प्रवास सुरू केला. तोपर्यंत काहीच सुचले नव्हते. मनातल्या मनात मात्र विचारचक्र सुरू होते आणि त्यातूनच सुचले ‘जडतो तो जीव, लागते ती आस, बुडतो तो सूर्य, उरे ते आभाळ’. बसच्या तिकिटाच्या मागील बाजूस त्यांनी हे लिहायला घेतले आणि एका तिकिटावरील जागा संपली म्हणून आणखी एक तिकीट घेतले. खरा कलाकार हा असा असतो. त्याला काही सुचताच तो असा व्यक्त होण्यास प्राधान्य देतो. अशोक पत्की यांनी ते शीर्षक गीत संगीतबद्ध केले. मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘वादळवाट’ या 941 भाग चाललेल्या या मालिकेचेही ‘धूसर धूसर एक वादळाची वाट’ हे शीर्षक गीत मंगेश कुलकर्णी यांचेच. ही गीते अनेकांची मोबाईल रिंगटोन होती हे विशेषच. ‘लाइफलाइन’ या वैद्यकीय क्षेत्रातील मालिकेचे लेखनही त्यांचेच. तसेच त्यात भूमिकाही साकारली. मोठ्या इस्पितळातील दररोज घडणाऱ्या बऱ्यावाईट घटना त्यात होत्या. मंगेश कुलकर्णींनी आपल्या लेखनात मोठ्याच प्रमाणावर विविधता ठेवली हेही सतत अधोरेखित होत राहिले. रंगभूमीवरही मंगेश कुलकर्णींचे विशेष उल्लेखनीय योगदान. विजया मेहता यांच्या अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारली. ‘महासागर’ या नाटकात त्यांनी साकारलेली वेड्याची भूमिका बहुचर्चित ठरली.

‘मोरूची मावशी’ या नाटकातील ‘अडत नडत तडका बाजा’, ‘बरा सापडलास’ ही गाणी मंगेश कुलकर्णींची. नाटकातील दृश्य व संवाद कमी करण्याचा प्रयत्न म्हणून प्रवाही अशा गाण्यांची आवश्यकता असे. त्यात मंगेश कुलकर्णींचे कौशल्य होते. ‘सही रे सही’ हे नाव व शीर्षक गीतही मंगेश कुलकर्णी यांचेच. ‘आपलं माणूस’ या नावाचे नाटकही त्यांनी लिहिले.

मूळचे नाशिकचे असलेले मंगेश कुलकर्णी अविवाहित होते आणि मनोरंजन क्षेत्रात नाना पाटेकरांचा जवळचा मित्र म्हणून ओळखले गेले. नाना पाटेकर लिखित व दिग्दर्शित ‘प्रहार’च्या (1991) अंधेरी पश्चिमेकडील फिल्मालय स्टुडिओतील सेटवरील दीर्घकालीन शूटिंग शेड्यूलमध्ये अधूनमधून मंगेश कुलकर्णीही असत. मंगेश कुलकर्णींनी हिंदी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक म्हणून उत्तम वाटचाल केली. पार्थो घोष दिग्दर्शित ‘गुलाम-ए-मुस्तफा’,  प्रकाश झा दिग्दर्शित ‘दिल क्या करे’, अझीझ मिर्झा दिग्दर्शित ‘यस बॉस’ या चित्रपटांचे लेखन मंगेश कुलकर्णींचे. टी. के. राजीव कुमार दिग्दर्शित आणि अरविंद स्वामी व मनीषा कोईराला यांची भूमिका असलेल्या ‘राजा को रानी से प्यार हो गया’ या चित्रपटाचे संवाद मंगेश कुलकर्णींचे होते, पण चित्रपट निर्मिती अवस्थेत फारच रखडल्याने दुर्दैवाने मंगेश कुलकर्णींच्या कामाला दाद मिळाली नाही. चित्रपट हे दृश्य माध्यम, दूरदर्शन मालिका घराघरांत पोहोचवण्याची संधी आणि रंगभूमी हे शब्द सामर्थ्याची गरज अशा तीनही माध्यमांतून मंगेश कुलकर्णी यांनी यश प्राप्त केले हे विशेष उल्लेखनीय.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई ‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे आणि गुद्दे समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या निवडणुकीत वोट जिहाद होत...
पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”
“तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो बाहेर आल्यावर तसा नाही..”; वादावर काय म्हणाली अंकिता?
जुही चावलाची वादग्रस्त पोस्ट, ‘एखाद्या गटारात राहतोय असं…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
अमित ठाकरे यांना का मतदान करावं? मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं
कपूर, खान नाही तर बॉलिवूडमधील ‘हे’ कुटुंब सर्वांत श्रीमंत; तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती, एकेकाळी विकायचे फळं
भाजपची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा पोकळ; काँग्रेसच्या आराधना मिश्रा यांची टीका