Maharashtra Election 2024 – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाचवी यादी जाहीर; मोहोळ, पंढरपूरचे उमेदवार घोषित
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवार यांनी एकूण पाच जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत X हॅंडलवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत माढा, मुलुंड, मोर्शी, पंढरपूर आणि मोहोळ या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. माढामधून अभिजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मुलुंडमधून संगिता वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोर्शीमधून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत आणि मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कृपया प्रसिद्धीसाठी…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/6idD0OGYmw
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 29, 2024
गेल्या 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यांनतर 26 तारखेला 22 उमेदवारांची दुसरी यादी तर 27 ऑक्टोबरला 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर 28 ऑक्टोबर रोजी 7 उमेदवारांच्या नावांची चौथी यादी जाहीर केली होती. यानंतर आज आणखी 5 उमेदवारांच्या नावाची पाचवी यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकूण 87 उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आली आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List